Special Report : पंतप्रधान मोदी यांच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार, कोण काय म्हणाले?

दरवर्षी लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांचे बळी दरवर्षी जात होते. खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचविण्याचं काम आम्ही करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

Special Report : पंतप्रधान मोदी यांच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक वार, कोण काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:52 PM

मुंबई : मुंबईतील बीकेसी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मोठी सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडलेत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बेईमानी केल्याची टीका केली. तर, एकनाथ शिंदे यांनी आम्ही मोदी यांचेह आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शाब्दिक तोफ ठाकरे यांच्यावर धडाडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच्यावर विश्वास ठेऊन महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिनची सरकार आणली. पण, काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून अडीच वर्षे जनतेच्या मनातील सरकार बनू शकली नाही. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमती केली. मोदीची तुमच्या नेतृत्वात लोकांच्या मनातील सरकार आलं.

25 वर्षांत मुंबईकरांना शुद्ध पाणी नाही

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. पण, गेल्या २५ वर्षांत त्यांनी घरचं भरलं अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आतापर्यंत मुंबईत सत्ता असणाऱ्यांनी फिक्स डिपॉझीट केलेत. स्वतःची घरं भरली. पण, मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.

खड्ड्यात जाणारा पैसा वाचविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सिमेंटच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरलं. काँक्रिटच्या रस्त्यावरून टीका केली जात आहे. याला खोडा घालण्याचं काम काही लोकं करतात. दरवर्षी लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता. खड्ड्यांचे बळी दरवर्षी जात होते. खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा वाचविण्याचं काम आम्ही करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

याचा काही जणांना त्रास होतोय

डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पांढरं करणाऱ्यांची दुकानं सिमेंटच्या रस्त्यामुळं बंद होतील. यामुळं काही जणांची पोटदुखी उठली आहे. मळमळ सुरू झाली आहे. पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. सहा महिन्यांत यवढं काम झालं मग, दोन वर्षात किती होईल, याचा सर्वांना त्रास होत असल्याचंही शिंदे यांनी सुनावलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.