Vidhan Parishad Election : हॉटेल बदलून निवडणुका जिंकता येत नाहीत, शेलारांचा आघाडीला टोला, तर खडसेंबाबतही म्हणतात…
एकनाथ खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा गोप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यावरून भाजप नेते आशिष शेल रायंनी जलील यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : राज्यातल्या भाजप (BJP) नेत्यांची आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतरही भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) तोफा डागणं सुरूच ठेवलं आहे. राज्यसभेतील पराभवानंतर साध झालेल्या महाविकास आघाडीतील काही पक्षांनी आपले आमदार पुन्हा हॉटेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीला कोपरखळ्या मारल्या आहेत. हॉटेल बदलून निवडणुका जिंकता येत नसतात. तुम्ही काहीही करा या निवडणुकीत विजय हा आमचाच होणार, असे शेलार ठणकावून सांगत आहेत. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा गोप्यस्फोट इम्तियाज जलील यांनी केला होता. त्यावरून भाजप नेते आशिष शेल रायंनी जलील यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार काय म्हणाले?
या निवडणुकीबाबात बोलताना शेलार म्हणाले, हॅाटेल बदलून विजय होत नसतो, त्यांनी आमदार कोणत्याही हॅाटेलमध्ये ठेवले, तरी विधान परिषदेत विजय आमचाच होणार आहेत. तसेच खडसे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, कोणाला एका व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही, आम्ही सेवक म्हणून निवडून येऊन काम करण्यासाठी निवडणूका लढवतो. MIM ही शिवसेनेची बी टीम आहे. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेने डबल स्टारवाली मते आपल्या खांद्यावर लावली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
माझा सगळीकडे वावर असतो
तर शिवसेने काय तयारी केली त्यावर भाष्य करण्याची मी आवश्यकता नाही, भाजपच्या उमेदवारांचा विजय हे तिन्ही पक्ष रोखू शकत नाही, नरिमन पॉईंट काय आणि पवई काय माझा वावर सगळी कडे असतो, तिथे कोल्डिंक प्यायला जाऊ हॉटेल बदलले म्हणून मानस बदलत नाही, असे सूचक विधानही शेलार यांनी केलं आहे.
जलील यांनाही जोरदार प्रत्युत्तर
तसेच इम्तियाज जलीलांना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे, हे त्यांनी आधी बघावे मग दुसऱ्याच्या घरात वाकून बघावे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर mim आणि शिवसेनेची युतीसुध्दा मुंबईपालिका निवडणुकीत बघायला मिळेल, याचे मला आश्चर्य वाटणार नाही, असेही शेलार म्हणाले आहेत. भाजप या निवडणूकीत उतरली आहे, भाजप कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणूक जिंकणारच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसोबतच आगामी मुंबई महापालिकेची निवडणूकही जोरदार होणार आहे हे मात्र निश्चित झालंय. आता शेलारांचे हे दावे किती खरे ठरतात हे निवडणुकीनंतरच कळेल.