ओबीसी आता संभाजीनगरमध्ये विराट संख्येत एकवटणार, विजय वडेट्टीवार यांनी तारीख सांगितली

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. ओबीसींच्या हक्कासाठी येत्या 20 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरला ओबीसी एकवटणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली.

ओबीसी आता संभाजीनगरमध्ये विराट संख्येत एकवटणार, विजय वडेट्टीवार यांनी तारीख सांगितली
Vijay Wadettiwar
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 4:32 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाराष्ट्र सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेत्यांमध्ये धुसफूस बघायला मिळत आहे. मराठा समाजाच्या लाखो नागरिकांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत. हा आकडा 57 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार आहे. याशिवाय सरकारने मनोज जरांगे यांच्या सगेसोयरीबाबतची मागणी मान्य केल्यामुळे मराठ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पण यात निर्णयाविरोधात राज्यभरातील ओबीसी नेते एकवटत आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याआधीच या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानीदेखील याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली.

“आम्ही 20 तारखेला संभाजीनगरला विराट स्वरुपात ओबीसींच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ”, अशी मोठी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला आरक्षण दिलंय याचा विरोध नाही. आमच्या अंगावर कुणी येण्याचा विषय नाही. आम्ही आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही लढतोय. तुम्ही आरक्षण मिळवलंत, आता आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे. त्यासाठी संभाजीनगरला 20 फेब्रुवारीला सभेचं आयोजन केलं आहे. या सभेसाठी आम्ही मंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रण देणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाज एकत्र यावा, आपल्या हक्काचं संरक्षण करावं, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत”, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

‘मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरे शेपूट घालून…’

“मंत्रिमंडळात तुम्ही पाहताय, किती ओबीसी चेहरे आहेत. जे आहेत त्यापैकी अनेक जण शेपूट घालून सत्तेची खुर्ची उपभोगत आहेत”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. “शेपूट घालून हा शब्द मुद्दाम वापरला. त्यांना सत्ता महत्त्वाची आहे, ओबीसी बांधवांचं हीत महत्त्वाचं वाटत नाही. कारण त्याने शेपूट घातली आहे. कुणी लढतो आहे, तो एकटा पडणारच. पण ओबीसी समाज संघर्ष करणाऱ्यांच्या बाजूला उभा राहील”, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.