Maratha Reservation: विनायक मेटे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम, परवानगीसाठी गृहमंत्र्यांच्या भेटीला

मोर्चाची घोषणा झाल्यापासून समाजात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे | Vinayak Mete

Maratha Reservation: विनायक मेटे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम, परवानगीसाठी गृहमंत्र्यांच्या भेटीला
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 12:18 PM

मुंबई: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून समाजातील अभ्यासक आणि जाणकारांच्या भेटीगाठी सुरु असतानाच आंदोलनासाठी आग्रही असणाऱ्या विनायक मेटे यांनीही हालचाल सुरु केली आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चासाठी परवानगी मिळवण्यासाठी मेटे यांनी गुरुवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. (Vinayak Mete meet home minister dilip walse patil for Maratha Morcha Permission)

यावेळी विनायक मेटे यांनी गृहमंत्र्यांकडे एक निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून 2021 बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी.

मोर्चाची घोषणा झाल्यापासून समाजात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्याचे आढळून आले आहे. तरी आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या शांततेत निघण्याचा इतिहास लक्षात घेऊन हा नियोजित मोर्चा शांततेत काढण्यासाठी पोलीस प्रशासन व आपण सहकार्य करण्याची मागणी, या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संभाजीराजे छत्रपती राज्यभरात मोर्चे काढण्याच्या विरोधात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.

मोर्चे काढण्याची गरजच काय?

जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला होता.

रस्त्यावर उतरून कोरोनामुळे लोक मेले तर काय करायचं? राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन करावेच लागेल. मात्र, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे. श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

Maratha Reservation: शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

(Vinayak Mete meet home minister dilip walse patil for Maratha Morcha Permission)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.