Vinod Tawde : विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?

महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. एवढेच नाही तर तावडे यांचं नाव राज्यसभेसाठीही आघाडीवर आहे. जुलै महिन्यात राज्यभेच्या काही जागांसाठी निवडणूक पार पडत आहे.

Vinod Tawde : विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?
विनोद तावडेंचा वनवास संपला, त्रिपुराच्या निमित्ताने मोठी जबाबदारी, राज्यसभेवरही संधी मिळणार ?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 5:23 PM

मुंबई : आज राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच देशाच्या राजकारणातही खळबळ माजवणाऱ्या घटना घडत आहे. कारण त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लव देव (Biplab Kumar Deb resigns) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र यात भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांचा वनपास संपला आहे. कारण महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची त्रिपुरामध्ये पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही या राजकीय घडामोडीतील एक वेगळेपण आहे. एवढेच नाही तर तावडे यांचं नाव राज्यसभेसाठीही आघाडीवर आहे. जुलै महिन्यात राज्यभेच्या काही जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. यात भाजपकडून विनोद तावडे आणि महिला नेत्या विजया राहटकर यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपासून सुरू असलेला विनोद तावडे यांचा वनवास आता संपला आहे.

तावडेंना राज्यसभेवर संधी?

विनोद तावडे यांनी राष्ट्रय राजकारणात पुन्हा एकदा दमदार कमबॅक केलं आहे. येत्या काही महिन्यात त्रिपुरात निवडणुका पार पडणार असल्यामुळे आता तावडे त्रिपुराची कमान कशी संभाळणार? याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत.भाजप नेते विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीटही देण्यात आले नव्हते. त्यानंतर काही दिवस तावडे यांचे हात मोकळेच होते. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात पक्षाची मोठी जबाबादारी त्यांच्याकडे देण्यात आली आणि आता आता त्यांच्यावर त्रिपुरात मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे, त्यामुळे तावडे राज्यसभेवर गेले तर आश्चर्य नको वाटायला. मात्र हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

त्रिपुरात नेमकं काय घडलं?

भाजपने गेल्या काही महिन्यात अनेक राज्याचे मुख्यमंत्री बदलले आहेत. त्रिपुरातही तेच घडलं आहे. मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यावरील पक्षांतर्गत नाराजी आणि आमदारांची गळती थांबवण्यासाठी हा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचवेळी, बिप्लव यांच्या राजीनाम्यानंतर संध्याकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही होणार असून, त्यात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा होऊ शकते. 2018 मध्ये बिप्लब देब मुख्यमंत्री झाले. त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपने राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवण्याचा पवित्रा घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता त्रिपुराचा नवा मुख्यमंत्री कोण असणार आणि आगाडी निवडणुकीत भाजप हे राज्य पुन्हा जिंकणार की मुख्यमंत्री बदलाचे सत्र इथे महागात पडणार? हे आगामी निवडणुकीतील निकालच सांगतील.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.