मोठी बातमी! महाविकास आघाडीत शीतयुद्ध? विश्वजीत कदम म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र…’

विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन अजूनही शीतयुद्ध सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सांगलीत पुढच्या सहा दिवसात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडीत शीतयुद्ध? विश्वजीत कदम म्हणाले, 'कुठेतरी षडयंत्र...'
विश्वजीत कदम यांचं सांगलीच्या जागेबाबत मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 4:20 PM

महाविकास आघाडीमधील सांगली जागेबाबातचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही. महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा ही काँग्रेसला सुटली. या जागेवर शिवसेनेचा विद्यमान खासदार असल्याने ठाकरे गटाचा या जागेवर दावा होता. पण छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्यासाठी ठाकरे गटाने जागा सोडली. या जागेच्या मोबदल्यात ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. पण सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा या जागेवर पक्का दावा होता. काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीच्या जागेवर उमेदवारीवर ठाम राहिले. पण पक्षाने ठाकरे गटाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता दिली. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विशाल पाटील यांच्यावर यानंतर पक्षाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. असं असताना आज विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत जे वक्तव्य केलं आहे ते पाहता सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत अजूनही शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे.

“सांगलीच्या जागेबाबत काहीतरी षडयंत्र घडलं आहे. आम्ही षडयंत्र शोधून काढू”, असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत. “काहीतरी शिजलं म्हणून काँग्रेसची जागा ठाकरे गटाकडे गेली. मी आणि विशाल पाटलांनी सांगलीत काँग्रेस वाढवण्याचं काम केलेलं आहे”, असंदेखील विश्वजीत कदम म्हणाले आहेत. तसेच “विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील”, असंही विश्वजीत कदम म्हणाले

विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?

“कुठेतरी काहीतरी शिजलंय. काय शिजलंय, कसं शिजलंय? कुणी शिजवलं हे येणाऱ्या काळात त्यातील सत्या उघडकीस येईल. पण एक नक्की सांगलीची जागा ही जात नव्हती. पण काहीतरी षडयंत्र झालेलं आहे. जेणेकरुन राज्याच्या राजकारणात मला आणि जिल्ह्याच्या राजकारणात विशालला असेल, किंवा आम्हा दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे मी त्यादिवशी भाषणात बोललो की, काहीतरी घडलं आहे. ते काय घडलं, कुणामुळे घडलं, कशामुळे घडलं हे येणारा काळ त्याबाबत सांगेल. सांगलीच्या जागेबाबत भविष्यात कुणी हक्क सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे जे काही घडलं आहे, अपवादात्मक घडलं आहे. भविष्य काळात हा प्रश्न उद्भवत नाही हे मी ठाम भूमिकेत आहे”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

विशाल पाटील यांच्यावर कारवाई का नाही?

“काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षात अशा कारवाया करायच्या असतील तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. सांगलीतून मुंबई, मुंबईतून आमचे प्रभारी, प्रभारींकडून दिल्लीत असं टप्प्याटप्प्यात प्रक्रिया असते. मला वाटतं देशात जनता ठरवते की, कोणत्या पक्षाचा उमेदवार असला पाहिजे, तसं सांगलीची जनता ठरवेल”, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली.

विश्वजीत कदम हे कोल्हापरूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते शहरात आले आहेत. “यंदा शाहू महाराजांना कोल्हापूरची जनता ही निवडून देईल, हा विश्वास आहे. कारण कोल्हापूरच्या जनतेसाठी छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक धरण, शाळा आणि कॉलेज बांधले. त्यामुळे जनता त्यांच्यामागे उभी राहील”, असं विश्वजीत कदम म्हणाले. “छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसावरुनसुद्धा सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात आली. या टीकेमुळे सत्ताधारी किती अस्वस्थ आहेत हे दिसून येत आहे”, अशी टीका विश्वजीत कदम यांनी केली.

यावेळी विश्वजीत कदम यांना विशाल पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विश्वजीत कदम यांनी भूमिका मांडली. “विशाल पाटील हे आमच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कारवाईच्या संदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण विशाल पाटील असूदे किंवा मी, आम्ही सांगलीत काँग्रेस वाढवण्याच काम केलं आहे”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान भाषण करताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेवर विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार हे राज्याच्या राजकारणात गेल्या 55 वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असे वैयक्तिक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण हे चुकीचं आहे. अशा टीकेमुळे समजून येतं की, राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळू ही सरकली आहे”, असं विश्वजीत कदम म्हणाले.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.