Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?

विश्वास नांगरे पाटील यांनी संचारबंदीवेळी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असल्याचे स्पष्ट केले. (Vishwas Nangare Patil Night Curfew )

Vishwas Nangare Patil | मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले?
विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त, मुंबई पोलीस
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 3:13 PM

मुंबई: मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाईट कर्फ्यूदरम्यान मुंबईत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई आहे पण संचाराला बंदी नाही, असं स्पष्ट केलं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासानं आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 5 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लावला आहे. (Vishwas Nangare Patil Night Curfew )

नाईट कर्फ्यूमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये. रात्री अकरानंतर चार पेक्षा लोक कामानिमित्त बाहेर पडू शकतात. चार पेक्षा कमी नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात,असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नाईट कर्फ्यू हा नागरिकांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी लावण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईमध्ये नाईट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर ११ वाजता बंद करणे सक्तीचे करण्यात आलेय. लोक मॉर्निंग वॉकला जाऊ शकतात. मात्र, चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही, असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. नाईट कर्फ्यूदरम्यान सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. नाईट कर्फ्यूदरम्यान नागरिक दुचाकी आणि चारचाकीवरुन प्रवास करु शकतात. मात्र, चारचाकीमध्ये चारपेक्षा अधिक लोकांना प्रवास करता येणार नाही, असंही ते म्हणाले.

राज्य सरकारनं लागू नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं नाईट कर्फ्यू लावला आहे. कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकेल किंवा गाडी चालवू शकता. पण, फक्त चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणं गरजंच आहे, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले. (Vishwas Nangare Patil on Night Curfew )

काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील?

5 जानेवारीपर्यंत संचारबंदी

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला. राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

कोरोनाचा कहर: ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; केंद्राचा मोठा निर्णय

(Vishwas Nangare Patil on Night Curfew )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.