Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Cut: बोरिवली ते दहिसरमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार; महापालिका म्हणते, पाणी जपून वापरा!

Water Cut: पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.

Water Cut: बोरिवली ते दहिसरमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार; महापालिका म्हणते, पाणी जपून वापरा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 5:27 PM

मुंबई: बोरिवली (पूर्व) (Borivali) परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर 1050 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मंगळवार, दिनांक 10 मे रोजी सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजेच मंगळवार 10 मे रोजी सकाळी 11:30 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा वेळेत कपात (Water Cut) करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. म्हणजे बोरिवली ते दहिसर परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही ठिकाणी पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने (bmc) केले आहे.

कोणत्या भागात पाणीबाणी

  1. ‘आर मध्य’ विभागः अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर – (सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  2. ‘आर उत्तर’ विभागः ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर – (सकाळी 8.30 ते 10.45 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 8.30 ते 10 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  3. ‘आर मध्य’ विभागः अ) काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मजीद परिसर – (सकाळी 10.45 ते दुपारी 12.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 10 ते 11.30 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  4. ‘आर उत्तर’ विभागः ब) अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज 1 व 2 – (सकाळी 10.45 ते दुपारी 12.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान सकाळी 10 ते 11.30 पाणीपुरवठ्याची वेळ राहील).
  5. हे सुद्धा वाचा
  6. ‘आर उत्तर’ विभागः शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलीफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक 1 व 2, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर – (सायंकाळी 5.30 ते 7.40 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
  7. ‘आर उत्तर’ विभागः आनंद नगर, आशिष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग – (रात्री 9.30 ते 11.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, 10 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).
  8. वरील तपशिलानुसार संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.