Water Supply : बोरिवली आणि दहिसरमधील काही परिसरांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Water Supply : बोरिवली आणि दहिसरमधील काही परिसरांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
बोरिवली आणि दहिसरमधील काही परिसरांमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 8:16 PM

मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील ‘आर मध्य’ विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम गुरुवार 5 मे 2022 रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून शुक्रवार 6 मे 2022 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. सदर कालावधीत म्हणजेच गुरुवार 5 मे 2022 रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून शुक्रवार 6 मे 2022 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Water supply will be cut off for two days in some areas of Borivali and Dahisar)

आर मध्य विभागात या परिसरात पाणीपुरवठा बंद

‘आर मध्य’ विभागात चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली (पश्चिम) विभाग – (सायंकाळी 7.10 ते रात्रौ 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, दिनांक 6 मे 2022 रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील).

आर उत्तर विभागात या परिसरात पाणीपुरवठा बंद

‘आर उत्तर’ विभागात एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गाव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभाग – (रात्री 9.40 ते रात्री 11.55 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, 6 मे 2022 रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहील). (Water supply will be cut off for two days in some areas of Borivali and Dahisar)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.