क्लिनअप मार्शलच्या हाणामारीचे जुने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; महापौर आक्रमक

| Updated on: Feb 21, 2021 | 3:44 PM

पालिकेच्या क्लिनअप मार्शलच्या हाणामारीचे जुने व्हिडीओ व्हायरल करून महापालिकेला बदनाम करण्यात येत आहे. (we can get strong action against those who viral cleanup marshall old video)

क्लिनअप मार्शलच्या हाणामारीचे जुने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; महापौर आक्रमक
kishori pednekar
Follow us on

मुंबई: पालिकेच्या क्लिनअप मार्शलच्या हाणामारीचे जुने व्हिडीओ व्हायरल करून महापालिकेला बदनाम करण्यात येत आहे. त्याची आम्ही गंभीर दखल घेतली असून हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिली. महापालिकेची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (we can get strong action against those who viral cleanup marshall old video)

मास्क कारवाई दरम्यान मुंबईकर आणि मार्शलमध्ये होणाऱ्या झगड्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी आज महापौर बंगल्यावर क्लिनअप मार्शलची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकारी आणि मार्शल यांना काही सूचना केल्या. त्यानंतर मीडियाशी बोलताना जुने व्हिडीओ व्हायरल करून करण्यात येत असलेल्या पालिकेच्या बदनामी विरोधात तीव्र नापसंती व्यक्त केली. काल जुहू येथील मार्शलच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ जुना आहे. कुणी तरी पालिकेची बदनामी करण्यासाठी हा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे या खोडसाळ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

तर मुंबईकरांवर गुन्हे दाखल होणार

क्लिनअप मार्शलने नम्रपणे आणि सभ्यतेने मुंबईकरांना समजवायला हवं. दंड वसूल करणं हा आपला उद्देश नाही. कोरोना रोखण्यासाठी लोकांना जागृक करणं हा आपला उद्देश आहे, असं सांगतानाच दंड वसुली करताना मार्शलकडून चूक झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कारवाई दरम्यान मार्शलशी हुज्जत घालणाऱ्या मुंबईकरांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

प्रवाशांवर कारवाई

विमानतळावरून काही प्रवासी क्वारंटाईन न होता परस्पर पळून जातात. त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या काही स्थानिक टोळ्याही तिथे सक्रीय असतात. त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पुढचे 15 दिवस महत्वाचे

पुढचे १५ दिवस सर्वांसाठीच महत्वाचे आहेत. गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्यानं मुंबईकर बिनधास्त झाले होते. कोरोना नियमांचे पालन करत नव्हते. त्याचे परिणाम आपण पाहत आहोत. त्यामुळे मुंबईकरांनी आता तरी सावध व्हावे आणि खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करावे, असं आवाहनही त्यांनी केलं. (we can get strong action against those who viral cleanup marshall old video)

 

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, ‘या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!’

सावधानता बाळगा अन्यथा कोरोना पुन्हा येईल; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा

(we can get strong action against those who viral cleanup marshall old video)