CM Eknath Shinde: उंटावरुन शेळ्या हाकत नाही, अजितदादांच्या आधी आमचा पूरभागात दौरा झाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

निहार ठाकरे हे देखील स्वतः मला भेटले त्यांनी देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे. त्यांनाही एक समाधान वाटलं. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून समाधान व्यक्त केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे सर्वजण आपल्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

CM Eknath Shinde: उंटावरुन शेळ्या हाकत नाही, अजितदादांच्या आधी आमचा पूरभागात दौरा झाला, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 6:28 PM

मुंबई – पूरग्रस्त भागात सरकार पोहचत नसल्याची टीका विरोधक सातत्याने करत आहेत, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही उंटावरुन शेळ्या हाकत नाही, असे सांगत पूरग्रस्त भागाचा दौरा विरोधकांच्या आधी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पूर ओसरल्यावंर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी दौरा केला. प्रत्यक्ष पूरस्थिती असताना आपण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी पोहचलो होतो, असेही त्यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत कुठल्याही शेतकऱ्याला (flood affected farmers)त्याचं नुकसान झालेलं आहे त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. असेही त्यांनी सांगितले. ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि दोन-तीन दिवसांमध्ये सर्व शंभर टक्के, योग्य ती मदत शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने दिली जाईल, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. अधिकारी, कॅबिनेटमध्येही याचा आढावा घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

निहार ठाकरेंच्या भेटीने आनंद – शिंदे

निहार ठाकरे हे देखील स्वतः मला भेटले त्यांनी देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे. त्यांनाही एक समाधान वाटलं. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून समाधान व्यक्त केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत, त्यामुळे सर्वजण आपल्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

दौऱ्याचा सांगितला हेतू

त्या-त्या ठिकाणी भागांमध्ये, प्रत्यक्ष जाऊन तिथल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेऊ, असेही त्यांनी सांगतिले. तसेच मतदारसंघातले त्या त्या विभागातले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचा देखील आढावा घेऊ असे शिंदे म्हणाले. हा दौरा जनतेला न्याय देण्यासाठी असेल, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सगळं ठरलेलं आहे, काळजी करू नका, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. सरकारचं काम वेगाने सुरू आहे, एक महिना देखील या सरकारला झालेला नसताना अनेक महत्त्वकांक्षी आम्ही निर्णय घेतलेत, असेही शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी राज्यातल्या जनतेसाठी अनेक निर्णय घेतले आहेत, हे आपल्याला माहित आहेत, असे शिंदे म्हणाले. सरकारचं काम युद्धपातीवर किंबहुना जे लोकांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे होतंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळेच जनतेचा हजारोंच्या-लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळतोय. हे सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.