तुरुंगवास भोगावा लागला त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया नेमकी काय?
पण, ते विद्वान आहेत, हे मान्य केलं पाहिजे, अशी कबुली दीपक केसरकर यांनी दिली.
मुंबई : संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली. याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणं हे राज्य सरकारची स्तुती करण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, यासाठी हा उठाव होता. त्याच्यामुळं आमची भूमिका त्यांनासुद्धा मान्य झाली. याचा आम्हाला आनंद आहे. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. प्रवक्ते आहेत. व्यक्तिबद्दल व्यक्तिगत बोलायचं नसतं. टीका केली तेव्हा कडक शब्दात उत्तर दिलं.
पत्रावाला चाळीतील लोकांवर झालेल्या अन्यायाबाबचं प्रकरण होतं. या प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मिळाला. हे सर्व प्रकरण वाचावं लागेल. तेव्हा मी याबाबत बोलेन. तो दिवाणी वाद आहे, असं कोर्टाचं म्हणणं आहे. दिवाणी की फौजदारी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला आहे.
वाद आहे. तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या केसच्या संबंधात मी काही बोलणार नाही. पण, त्या केसच्या संबंधात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, असंही दीपक केसरकर म्हणाले.
चुकीचं बोलले म्हणून टीका केली. काळाच्या वेगात आम्ही ते विसरलो. जनतेसाठी राज्य चालवावं लागते. राजकारण हे त्यापुरते मर्यादित असतं. राज्य हे मुख्यमंत्रीचं चालवितात. उपमुख्यमंत्री हे अनुभवी आहेत. कुणाचा मान कसा ठेवावा, हे त्यांना माहीत असते. ऐकमेकांशी सल्लामसलत करून निर्णय घेतले जातात.
काही प्रवक्ते दिशाभूल करत होते. त्याला कुठंतरी ब्रेक बसला पाहिजे. संजय राऊत नसल्यामुळं माहीतगार कुणी प्रवक्ता नव्हता. राऊत यांची भाषा चुकीची असेल. अग्रेसिव्ह भाषेत ते बोलतात. पण, ते विद्वान आहेत, हे मान्य केलं पाहिजे, अशी कबुली दीपक केसरकर यांनी दिली.