Shahaji bapu: आम्ही दुष्काळी माणसं, आमच्याकडं डोंगर नाय, ना झाडी नाय.. अप्रूप वाटलं ते बोललो.. फेमस झाल्यावर आमदार शहाजीबापूंची प्रतिक्रिया..

गेले काही दिवस टीव्हीवर, बातम्यांत सगळीकडेच हा डॉयलॉग चांगलाच गाजल्याने, नेमका हा डायलॉग सुचला कसा असा प्रश्न शहाजीबापूंना करण्यात आला. त्याच्यावर त्यांनी नेमकं काय घडलं होतं तेच सांगितलं.

Shahaji bapu: आम्ही दुष्काळी माणसं, आमच्याकडं डोंगर नाय, ना झाडी नाय.. अप्रूप वाटलं ते बोललो.. फेमस झाल्यावर आमदार शहाजीबापूंची प्रतिक्रिया..
कसा झाला डायलॉग फेमस?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:17 PM

मुंबई – काय तो डोंगार.. काय ते झाडी.. काय ते हाटील.. ओक्के मध्ये आहे सगळं.. या डॉयलॉगफेम शहाजीबापूंनी (MLA Shahaji Bapu)हा डॉयलॉग नेमका कसा काय आला, हे टीव्ही9 मराठीच्या न्यूजरुममध्ये उलग़डून सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडात सहभागी झालेल्या सांगोल्याचे शहाजीबापू या डॉयलॉगमुळे (dialogue)जगभरात प्रसिद्ध झाले. या सगळ्या राजकारणात त्यांचा हा डॉयलॉग प्रत्येकाच्या अगदी राजकीय नेत्यांच्याही ओठांवर होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी शहाजीबापंचे नाव उच्चराताच सभागृहात काय झाडी, काय डोंगार.. असा सूर सगळ्याच आमदारांनी लावला होता. अजित पावर यांनीही या डॉयलॉगचा उल्लेख सभागृहात त्यांच्या भाषणात केला. गेले काही दिवस टीव्हीवर, बातम्यांत सगळीकडेच हा डॉयलॉग चांगलाच गाजल्याने, नेमका हा डॉयलॉग सुचला कसा असा प्रश्न शहाजीबापूंना करण्यात आला. त्याच्यावर त्यांनी नेमकं काय घडलं होतं तेच सांगितलं.

काय होती फोन करण्यापूर्वीची पार्श्वभूमी

शहाजीबापूंनी सुरुवातीला हा फोन कधी केला हे सांगितले. – सुरुवातीला गुवाहाटीला गेल्यानंतर फोन बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यानंतर कुठेही घरी फोन केला नव्हता. लॉबीतून जात असताना काही आमदार घरी बोलत असलेले दिसले. दुपारची वेळ होती, विचार केला की आपणही आपल्या घरी बोलून घ्यावं. कारण त्याचवेळी प्रकाश सुर्वे, सरवणकर यांच्या मतदारसंघात पोस्टर फाडणं, करणं, पुतळं जाळणं अशी आंदोलनं सुरु झाली होती. मला फार काही टेन्शन नव्हतं, कारण सांगोल्यातील शिवसेना ही माझ्या इशाऱ्यावर चालणारी आहे, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर चालणारी नाही. त्यामुळे त्याची भीती वाटत नाही. पण संपर्कच केला नाही तर धर्मपत्नी रागवेल, म्हणून तिला फोन केला, तर तिचा फोन बंद होता, म्हणून मग गेल्या ३०-३५ वर्षांच्या जीवाभावाचा मित्र रफीक नदाक, माजी नगराध्यक्ष सांगोला त्यांना फोन लावला.

ही तर भगवंताची लीला

शहाजीबापू पुढं म्हणाले..- त्यांना पहिल्यांदा फोनवर हा डायलॉग एकवला. ही माणदेशी भाषा आहेदु, ष्काळी पट्ट्यातील. ही सहजासहजी, दररोजची भाषा आहे. डायलॉग मारायचा म्हणून मारला नाही. हॉटेलात काचेच्या पुढे उभा होता. बाहेर बघत होतो आणि बोलत होतो. ते जे सौंदर्य होतो, ते सगळं त्यात आलं. आम्ही दुष्काळी माणसं, ना आमच्याकडे डोंगर नाय, ना झाडी नाय, काय काय नायं. अप्रूप जरा वाटलं, नवीन भाग, हिरवं जरा बघून. आम्ही कायम दुष्काळी भागातले. हिरवं आम्हाला दोन महिने पाहायला मिळतं पावसाळ्यात फक्त,.पुन्हा वाळलं खट्ट रान बघायला मिळतं. त्या अप्रुपापोटी सहज गेलेला डायलॉग, कसा प्रसिद्ध झाला, याचं मलाही आष्चर्य वाटतंय. ही भगवंताची लीला आहे की काय आहे म्हणायंच. हे कळना झालंय.

हे सुद्धा वाचा

डायलॉग व्हायरल झाल्यावर वाटली होती भीती

शहाजीबापू यांनी हा डायलॉग व्हायरल झाल्यावर भीती वाटली होती असेही सांगितले. ते म्हणाले – दुसऱ्या दिवशी हा डायलॉग व्हायरल झाल्याचे पीएने सांगितले. तो डायलॉग बघितला आणि थोडा घाबरलो. शिंदे साहेब काय बोलतील हे प्रेशर आलं. शिंदे साहेब म्हणाले होते, कुणाला बोलू ना, पण तरी बोललो, आता साहेब खवळत्यात का काय, याचं प्रेशर आलं होतं, असंही शहाजूबापूंनी मोकळेपणाने सांगितलं. का शिंदेंसोबत आलो ते मानतल्या भावना मित्राला सांगितल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.