मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले होते, याची माहिती आमच्याकडे असून वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांचा बोलविता धनी कोणी आहे का? असा सवाल केला जात आहे. (we have parambir singhs delhi visit details, says nawab malik)
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग यांनी पत्र लिहून कट कारस्थान केलं आहे. दिल्लीहून आल्यानंतर सिंग यांनी हे पत्र लिहिलं. दिल्लीत ते कुणाला भेटले? कधी भेटले? काय चर्चा केली? त्याची माहिती आमच्याकडे आहे. वेळी आली तर ही संपूर्ण माहिती उघड करू, असा इशारा मलिक यांनी दिला आहे.
बदली होणार म्हणून पुरावे गोळा केले
परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी चिठ्ठी लिहिल्याने अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. 17 मार्च रोजी बदली होणार हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे 16 मार्च रोजी त्यांनी प्रश्न विचारून विचारून त्यांचे चॅटचे पुरावे तयार केले.
फेब्रुवारीत देशमुख कोरोनावर उपचार घेत होते
देशमुख फेब्रुवारीमध्ये वाझेंना भेटल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे. देशमुख हे विदर्भ दौऱ्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते होम आयसोलेटेड होते. 27 तारखेला त्यांचा कोरोना रिपोर्ट आल्यानंतर ते निगेटिव्ह आले. त्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यात ते एकच दिवस लोकांना भेटले. त्यामुळे सिंग यांनी पुरावे गोळा करण्याचा कट केलेला दिसतो. मात्र, सिंग यांचे आरोप गंभीर आहेत. त्याची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही
अनिल देशमुख यांना गोवण्यासाठीच हे कुंभाड रचलं गेलं आहे. परिस्थितीवरून तरी तेच दिसत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. तसा निर्णयच पक्षाने घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशमुखांनी राजीनामा द्यावा: आठवले
परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यावर पहिल्यांदाच 100 कोटींचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातून देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं राजकारण नितिमत्तेवर आधारीत राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. (we have parambir singhs delhi visit details, says nawab malik)
शहांकडे मागणी करणार
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली पाहिजे. त्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे, असं आठवले यांनी सांगितलं. (we have parambir singhs delhi visit details, says nawab malik)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 22 March 2021https://t.co/dmhkh0Ca87
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
संबंधित बातम्या:
केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून पडलेत का; लेटरबॉम्ब प्रकरण विरोधकांवर बुमरँग होईल: संजय राऊत
भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘मातोश्री’ची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद
मोठी बातमी: NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?
(we have parambir singhs delhi visit details, says nawab malik)