भातखळकरांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : राष्ट्रवादी

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या अतुल भातखळकर यांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला.

भातखळकरांच्या आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 6:41 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या अतुल भातखळकर यांच्या तथ्यहिन आरोपाला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. (We just ignores Atul Bhatkhalkar’s allegations : NCP leader Mahesh Tapase)

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देशभरात वाढणारी लोकप्रियता लक्षात घेऊन व देशपातळीवरील नेतृत्व खासदार शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप करुन अतुल भातखळकर स्वतःची फालतू प्रसिद्धी करुन घेत असल्याचा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे. जनआशिर्वाद यात्रा कोरोना काळात घेणं हे चुकीचं आहे परंतु नैतिकतेचे भान विसरलेली भाजप जनतेच्या जीवाशी खेळ खेळत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर सर्वांनी मोठं कार्य केले आहे तेच भाजपला बघवत नाही आणि म्हणूनच राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

ही तर ‘जन छळवणूक यात्रा’; किशोरी पेडणेकरांकडून जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे. ही जन आशीर्वाद रॅली नाही तर जन छळवणूक रॅली आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या रॅलीची खिल्ली उडवली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, अशी खोचक टीका महापौर पेडणेकर यांनी केली आहे.

विरोधकांचं मीठ आळणी

एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर महापौरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केलं म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचं मीठ आळणीच राहिलं आहे, अशी टीका त्यांनी केली. मातोश्रीने करून दाखवलं. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसंही आम्हाला कुणी टार्गेट केलं तरी काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

इतर बातम्या

गायकवाड-राज समर्थकांमध्ये ‘इतिहासा’वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

(We just ignores Atul Bhatkhalkar’s allegations : NCP leader Mahesh Tapase)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.