कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही; आंबेडकर आक्रमक

केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. (we will oppose to sale public sector says prakash ambedkar)

कोणत्याही परिस्थितीत पब्लिक सेक्टर विकू देणार नाही; आंबेडकर आक्रमक
Prakash Ambedkar
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 4:16 PM

मुंबई: केंद्र सरकार सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याचं कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळेच शेअर मार्केट अप झाले आहे. मात्र, केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. (we will oppose to sale public sector says prakash ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका जाहीर केली. कोविड काळात शेअर मार्केट खेळण्यासारखं झालं होतं. आता शेअर मार्केट सावरलं आहे. सेन्सेक्स वाढला आहे. कारण केंद्राकडून सरकारी कंपन्यांचं खासगीकरण केलं जाईल असं कंपन्यांना वाटत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढली आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत सरकारला पब्लिक सेक्टर विकू देणार नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.

आयटी सेक्टरला दिलासा नाही

केंद्र सरकारने कोव्हिडनंतर आपलं पहिलं बजेट सादर केलं आहे. सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारी पाहिली तर केंद्राच्या तिजोरीत 19,76,424 लाख कोटी रुपये आहेत. सेन्सेक्स वाढल्याने अनेकांना सरकारने चांगलं बजेट मांडलंय असं वाटत आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे, असं त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोव्हिड काळात कामगार किंवा आयटी सेक्टरमधील कामगार हे व्हर्च्युअली काम करत होते. त्यांची परिस्थीत आज वाईट आहे. आयटी सेक्टरमधील कामगारांचे पगार कोव्हिड काळात कापले गेले. त्यामुळे या लोकांनाच आत्मविश्वास वाढवला जाईल, अशी अपेक्षा होती. पण बजेटमध्ये तसं काहीच दिसून आलं नाही. लॉकडाऊनमुळे ज्यांचं पुनर्वसन झालं त्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यांना नातेवाईकांच्या रेशनकार्डवर धान्य घ्यावं लागत आहे. त्यांच्यासाठी या बजेटमध्ये काहीच नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

केंद्राचं धोरण झिंगलेल्या दारुड्या सारखं

चायनीज अॅप बंद करण्यास आमचा पाठिंबा आहे. चायनीस वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या वस्तूंवर बंदी घातली तर चीनची गुंतवणूक भारतात कशी येईल? असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकारने एअर इंडिया विकल्यास 5,23,228 कोटी तर ओएनसीजी विकल्यास 1 ते 2 कोटी रुपये मिळतील. इंग्लंडमध्येही कंपन्या विकण्याचा प्रयोग करण्यात आला. पण त्यांनी सरकारी कंपन्या विकल्या नाहीत, आपल्याकडे मात्र सरकारी कंपन्या विकण्यावरच भर दिला जात आहे, असं सांगतानाच केंद्र सरकारचं धोरण झिंगलेल्या दारुड्या सारखं असल्याची टीकाही त्यांनी केली. (we will oppose to sale public sector says prakash ambedkar)

संबंधित बातम्या:

ईव्हीएम असावे की मतपत्रिका?; अजित पवारांनी सांगितला तिसरा पर्याय!

नाना पटोले ‘सह्याद्री’वर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देणार?

ती संघटना आहे की पक्ष मला कळत नाही, आदित्य ठाकरेंकडून मनसेची खिल्ली, टाईमपास टोळी उल्लेख

(we will oppose to sale public sector says prakash ambedkar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.