मुंबईसाठी पुढील 24 तास कठीण, हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तास मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केलाय. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीसाठी पुढील 24 तास कठीण असणार आहेत.
मुंबई : भारतीय हवामान खात्यानं पुढील 24 तास मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीसाठी पुढील 24 तास कठीण असणार आहेत. आगामी काही काळ मुंबईत तुफान पाऊस (Mumbai Rains) होण्याचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र आता बदललेल्या परिस्थितीनुसार यात बदल करत रेड अलर्ट देण्यात आलाय, अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी दिलीय. विशेष म्हणजे मुंबईत रविवारी आणि सोमवारी देखील मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं.
Dense and very intense clouds are observed over west coast, konkan region, Mumbai Thane Palghar, ghat areas and adjoining Arabian Sea in the latest satellite obs. Parts of interior also are covered with clouds… Watch for severe weather alerts issued by IMD pl. pic.twitter.com/YL2YS6ol48
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 21, 2021
दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई आणि आजूबाजूच्या भागात ‘‘वायु प्रणाली’’ तयार झाल्यात. याचा परिणाम म्हणून कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. मराठावाड्यात गुरुवारपर्यंत (22 जुलै) मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो.
हवामान विभागाच्या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे
- आयएमडीकडून मुंबईला रेड अलर्ट. ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊसाचा अंदाज. नवी मुंबई आणि पालघरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो.
- 22 जुलैपर्यंत परिस्थिती सुधारण होण्याची शक्यता नाही. मुंबई, ठाणे, पालघरसाठी आधीच ऑरेंज अलर्ट होता. आता रेड अलर्ट असल्यानं या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
- रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज.
- 45-50 किलोमीटर प्रति तास ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहण्याची शक्यता.
हेही वाचा :
ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात
राज्यात 5 जिलह्यात रेड अलर्ट; मुंबईत समुद्रात हायटाईडचा इशारा
मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!
व्हिडीओ पाहा :
Weather Red alert for Mumbai for next 24 hours by IMD