पाकमधील धुळीच्या वादळाने मुंबईकरांची हुडहुडी, गार वाऱ्यांनी मुंबई गारठली, येत्या 48 तासांत अवकाळीची शक्यता
Weather Update : येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या असून या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेत आहे.
मुंबई : पाकमधील धुळीच्या वादाळानं (Dust Cyclone) मुंबईसह संपूर्ण राज्याच्या वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या असून या पावसामुळे (Unseasonal Rain) पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झालेत आहे. वाढलेल्या थंडीत पावसाच्या शक्यतेनं बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईतील दादर , लोअर परेल, महालक्ष्मी आणि आसपासच्या भागात पावसाचा हलक्या सरींमुळे हवामानात गारवा (Low Temperature) वाढल्याचं जाणवलंय. मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली होती. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण दिवसभर पाहायला मिळालं. दरम्यान, यापूर्वी थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र रविवारी कोसळलेल्या सरींमुळे हवेत पुन्हा गारवा निर्माण झालाय. येत्या काही दिवसात किमान तापमान 15 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे गावच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडलाय. तर दुसरीकडे मुंबईत हुडहुडी वाढली आहे.
Light to moderate rain and snow with isolated heavy spells are expected to occur over Western Himalayas. Light to moderate rain over #UttarPradesh, #Bihar, #Jharkhand, #WestBengal, parts of #Haryana, #Punjab, #Assam and #ArunachalPradeshhttps://t.co/f7TLAS98tm
— SkymetWeather (@SkymetWeather) January 23, 2022
कोकण पुन्हा अवकाळीची शक्यता
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झालाय. पण पुढील दोन दिवसात कोकणात अवकाळी पावसाचा इ्शारा हवामान खात्याने वर्तवलाय. सध्या वातावरणाच अचानक बदल घडलेले पहायला मिळतायत. कडाक्याची थंडी गायब झालीय. तर सकाळपासून अनेक ठिकाणी मळभ असलेले पहायला मिळतेय. कोकणात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. सध्या किनारपट्टी भागात ढगाळ हवामान असलेलं पहायला मिळंतय.
23/01/2022: 15:05 IST; Light intensity intermittent rain/drizzle would occur over and adjoining areas of Nazibabad, Bijnaur, Chandpur, Amroha, Rampur (U.P.) during next 2 hours. pic.twitter.com/lDM831cE2o
— India Meteorological Department (@Indiametdept) January 23, 2022
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. समुद्राचं तापमान वाढल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये अवकाळी पाऊस झालाय. रविवारी सकाळपासून ढगाळ हवामान पाहायला मिळालं होतं. दरम्यान, येत्या 24 तासांत पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे आंबा बागायतदार धास्तावलेत.
जाणकारांचं काय म्हणणंय?
वातावरणात कार्बनचं प्रमाण वाढलं असून तापमान वाढ झाली असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. सहारा वाळवंटात ऐतिहासिक बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचेही परिणाम जाणवू लागले आहेत. सिमेंट आणि वीज निर्मितीमुळेही वातावरणात बदल घडत असल्याचं मत पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत यांनी व्यक्त केलंय. मानवजात आणि पृथ्वीच्या ऊच्चाटनाची ही सुरवात असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढील 12 तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणि आसपासच्या भागांत या सगळ्याचा परिणाम जाणव्याची शक्यता आहे.