धीम्या मार्गावरही आता गारेगार प्रवास, चर्चगेट-विरार दरम्यान स्लो AC लोकल

| Updated on: Nov 22, 2021 | 10:25 AM

चर्चगेट ते विरारदरम्यान लोकलने प्रवास (Local Travel) करणाऱ्यां प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान आता धीम्या मार्गावरही वातानुकूलित लोकलसेवा (AC Local) देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने (Western Railway) घेतला आहे. या मार्गावर नवीन 6 आणि बदली तत्त्वावर 2 अशा एकूण 8 लोकल फेऱ्या आजपासून या प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

धीम्या मार्गावरही आता गारेगार प्रवास, चर्चगेट-विरार दरम्यान स्लो AC लोकल
ac-local
Follow us on

मुंबई : चर्चगेट ते विरारदरम्यान लोकलने प्रवास (Local Travel) करणाऱ्यां प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान आता धीम्या मार्गावरही वातानुकूलित लोकलसेवा (AC Local) देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने (Western Railway) घेतला आहे. या मार्गावर नवीन 6 आणि बदली तत्त्वावर 2 अशा एकूण 8 लोकल फेऱ्या आजपासून या प्रवासी सेवेत दाखल होणार आहेत.

कशा असतील एसी लोकलच्या फेऱ्या

विरार ते चर्चगेटदरम्यान एक, बोरिवली ते चर्चगेटदरम्यान दोन तसेच, गोरेगाव-चर्चगेट मार्गावर या लोकल फेऱ्या धावणार आहेत. डाउन मार्गावर चर्चगेट ते नालासोपारा मार्गावर एक, चर्चगेट ते बोरिवली मार्गावर दोन आणि चर्चगेट ते गोरेगावदरम्यान या एसी लोकल धावणार आहेत.

एसी लोकलची संख्या 20 वर

चर्चगेट ते वांद्रे सकाळी 9.07 आणि वांद्रे ते चर्चगेट सकाळी 9.47 ची लोकल रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. या अतिरिक्त लोकल फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 20 आणि एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 1373 वर पोहोचली आहे.

मध्य रेल्वेवर दोन वातानुकूलित लोकलच्या माध्यमातून एकूण 26 लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मात्र, वातानुकूलित लोकल फेऱ्यांचे तिकीट जास्त असल्याने प्रवाशांचा त्यास फारसा प्रतिसाद दिसत नाहीये.

संबंधित बातम्या :

Video| धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न; महिलेचा गेला तोल, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल, जाणून घ्या नेमका फायदा कोणाला?