तरुणाच्या एका चुकीमुळे मुंबईची ‘लाईफलाईन’ खोळंबली, चर्चगेट रेल्वे स्थानकावर काय घडलं?
एका तरुणाला चर्चगेट रेल्वे स्थानकावर केलेली चूक चांगली भोवली आहे. त्याच्या एका चुकीमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे तब्बल 25 मिनिटे खोळंबली होती. त्यामुळे या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत लोकलने दररोज लाखो नागरीक प्रवास करतात. यामध्ये विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक, महिला विविध घटकांचा समावेश आहे. मुंबई लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पण अनेकदा ही लाईफलाईन मंदावते. काही वेळा तांत्रिक कारणाने या लाईफलाईनचा वेग मंदावतो. तर काही वेळा प्रवाशांमुळेदेखील लोकल वाहतुकीवर परिणाम पडतो. पण प्रवाशांमुळे लोकल खोळंबली तर रेल्वे कायद्यानुसार संबंधित प्रवाशांवर कारवाईदेखील होते. अशीच एक कारवाई नुकतीच एका 19 वर्षीय तरुणावर करण्यात आली आहे. एका तरुणाला चर्चगेट रेल्वे स्थानकावर केलेली चूक चांगली भोवली आहे. त्याच्या एका चुकीमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे तब्बल 25 मिनिटे खोळंबली होती. त्यामुळे या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.
चर्चगेट रेल्वे स्थानकात ओव्हर हेड केबलवर जॅकेट अडकल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुमित भाग्यवंत नावाच्या 19 वर्षीय तरुणावर आरपीएफने रेल्वे ॲक्ट 174(क) अंतर्गत ही कारवाई केली आहे. तरुणाला दंडाधिकाऱ्यांसमोर उभं करून दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित प्रकार हा आज दुपारी ३.१० मिनिटांनी घडला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेची रेल्वे सेवा पंचवीस मिनिटे रखडली होती.
नेमकं काय घडलं?
खरंतर तरुणाकडून अनावधानाने ही चूक घडली होती. पण तरीही सामाजिक ठिकाणी वावरताना आपल्याला भान असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्या चुकीचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. या तरुणाने आपल्याला मित्राला रेनकोट पास करत असताना ते मित्राच्या दिशेला फेकलं. पण भलतच काहीतरी घडलं. कारण रेनकोटचं जॅकेट त्याच्या मित्राच्या हातात न पडता थेट ओव्हरहेड केबलवर अडकलं. तरुण फलाट क्रमांक 3 वरून फलाट क्रमांक 2 वर उभ्या असलेल्या आपल्या मित्राला रेनकोट पास करताना संबंधित प्रकार घडला.
ओव्हर हेड वायर ही अतिशय महत्त्वाची असते. तसेच तिच्यात विजेचा करंटही तितकाच असतो. त्यामुळे तरुणाने आपल्या मित्राला रेनकोट देताना हातात योग्य पद्धतीने देणं अपेक्षित होतं. त्याने योग्य पद्धतीने हातात रेनकोटचं जॅकेट दिलं असतं तर ते ओव्हरहेड केबलवर अडकलं नसतं. यानंतर बघ्यांची मोठी गर्दी फलाटावर झाली. तसेच रेल्वे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. यामुळे रेल्वे पोलिसानी संबंधित तरुणावर कडक कारवाई केली.