एकनाथ शिंदेंवर गद्दारीच्या त्या आरोपांविषयी अजितदादा म्हणाले काय? अनेकांच्या भुवया उंचावल्या
Ajit Pawar on Eknath Shinde : कॉमेडियन कुणाल कामरा याच्या त्या गाण्यामुळे गद्दार आणि खुद्दारचा वाद महाराष्ट्र्रात पेटला. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी भिडले असतानाच आता अजितदादांच्या एका जुन्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे.

कॉमेडियन कुणाल कामरा याने खरंच विडंबन केले की कुठला तरी बदला काढला, यावर सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून मुंबईत वातावरण तापलं आहे. कुणाल कामरा दूर तिकडं तामिळनाडूत बसून त्याच्या उपदव्यापाचे पडसाद बघत आहे. तर दुसरीकडे उद्धव सेनेचे शिलेदार खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर अजितदादांनी दिलेले रोखठोक वक्तव्य पण चर्चेचा विषय ठरलं आहे.
कुणाल कामराची ठिणगी
कुणाल कामरा याने शिवसेना फुटीवर व्यंगात्मक कविता अथवा गाणे केले. त्यात एकनाथ शिंदे यांना त्याने गद्दार असल्याचे म्हटले. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर राज्यात, मुंबईत एकच संताप व्यक्त झाला. त्याने जिथे हे गाणं म्हटलं, तिथे तोडफोड झाली. त्याला धमकी सत्र सुरू झाले. सध्या कामरा हा तामिळनाडूमध्ये असल्याचे समोर येत आहे. तर तो आठ दिवसांनी पोलिसांसमोर येणार असल्याची माहिती पण समोर येत आहे. आजच मुंबई पोलीस त्याला दुसरे समन्स पाठवणार असल्याचे कळते.




संजय राऊतांनी काय केला व्हिडिओ पोस्ट
आपण अजितदादा एकनाथ शिंदे यांना जे म्हणाले, तेच म्हणालो अशी भूमिका कामरा येणे काल घेतली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचा एक जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. अजितदादा विरोधी पक्षात असतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यात दादा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.
या व्हिडिओत अजितदादा एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार म्हणतात. शेंबड्या पोराला सुद्धा 50 खोके एकदम ओके हे कळायला लागल्याचा चिमटा काढताना दिसतात. या व्हिडिओचा आधार कुणाल कामरा याने घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.
आता अजितदादा त्या वक्तव्यावर काय म्हणाले
अजित पवार हे सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी लोकप्रिय आहेत. अजितदादांनी त्यांच्या जुन्या व्हिडिओवर सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्या व्हिडिओवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षात असतानाच माझं ते वक्तव्य बरोबर होतं. पण आता तसं म्हणलं चुकीचं ठरेल असं अजित पवार म्हणाले. मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो विरोध पक्ष नेत्यांच्या काळात मी जे काही बोललो आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याच्यामुळे हे आशा जर मागच्या गोष्टी कोणी कोणी, काय काय बोलले हे पाहिले, तर त्या त्यावेळी ती ती व्यक्ती तशी तशी वक्तव्य करत असतात, असे अजित पवार म्हणाले. त्यावेळी ते जे बोललो ते योग्य होते, अशी भूमिका दादांनी घेतली होती.