Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?

पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar: मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत फरक, बिल्किस बानो प्रकरणात दोषींच्या सुटकेवर काय म्हणाले शरद पवार?
पाचवा एक्का आणणार कुठून, भाजपाचा सवाल
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 4:30 PM

ठाणे – लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे स्त्रियांच्या सन्मानाची जी भूमिका मांडतात, ती भूमिका प्रत्यक्षात बिल्किन बानो (Bilkis Bano)प्रकरणातील दोषींची सुटका करताना दिसली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar)यांनी केली आहे. बिल्किस बानो प्रकरणात सेशन कोर्ट, हाय कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. ही ११ किंवा १२ वर्षाची जन्मठेप दिली नव्हती. ती आजन्म जन्मठेपेची शिक्षा दिली. गुजरातमधील भाजपच्या सरकारने या आरोपींना मुक्त केलं. त्या आरोपींचा सत्कारही केला.

पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी भाषण दिलं. मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकलं. त्या भाषणात त्यांनी स्त्रियांच्या सन्मानावर जोर दिला. पण त्यांच्याच गुजरातमधील सरकारने अत्यंत घाणेरडं कृत्य करणाऱ्या आऱोपींना सोडून दिलं. यात लाल किल्ल्यातील भाषणात स्त्रियांची सन्मानाची जी भूमिका मांडली. तिची प्रचिती गुजरातमधून एका निर्णयातून समोर आली नाही. ही चिंताजनक आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सरकारमधून पाहायला मिळत आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

मोदी सरकारकडून ईडीच्या गैरवापराचा पवारांचा आरोप

राजकीय नेतृत्वाच्या मागे काही ना काही तरी कारणातून ईडी कशी लावता येईल, सीबीआय लावता येईल का हे प्रकार सुरू आहेत. अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. गुजरातमध्ये या तक्रारी आहेत. झारखंडमध्ये या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी केंद्रात ज्यांची सत्ता आहे, ते लोक त्यांची ज्या राज्यात सत्ता नाही, तिथलं सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकात आज भाजपचं सरकार आहे. पूर्वी हे सरकार नव्हतं. आधीच्या सरकारमधील काही लोक फोडले गेले. त्यांच्या मदतीने सरकार बनवलं. महाराष्ट्रात शिवसेनेतील एक वर्ग बाजूला केला आणि सरकार घालवलं. मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वात सरकार होतं. पण ते फोडून भाजपने सरकार स्थापन केलं आहे. सत्ता लोकांनी दिली नाही तर लोकांनी दिलेल्या सदस्यांना फोडून त्यांना बाजूला करून ही सत्ता हातात घ्यायची हे काम भापजने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

माणसं फोडून सरकार करणे हे देशासमोर आव्हान

देशात राज्य सरकारात त्यांना संधी मिळेल याचा विश्वास त्यांना नाही. केरळमध्ये, आंध्रात, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये बिगर भाजप सरकार आहे. हे बघितलं तर मोजक्याच राज्यात भाजपचं सरकार होतं. इतर राज्यात सरकार नाही. त्यामुळे लोकांचं मत काय होतं हे दिसून येतं. सत्ता येत नसेल तर माणसं फोडणं, ईडीचं वापर करणं हे चित्रं देशात दिसत आहे. हे देशासमोर आव्हान आहे. बिगर भाजपा पक्षांशी संवाद साधून आम्ही सरकार विरोधात जनमत तयार करणार आहोत. अजून चर्चा केलेली नाही. यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. असे शरद पवार म्हणाले.

दुसऱ्या पक्षातीन नेत्यांना त्रास देतायेत-पवार

राजकीय नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. राज्यात अनिल देशमुख यांच्यावर काय झालं सर्वांना माहीत आहे. त्यांना अटक केली. रेड मारली. किती रेड कराव्यात. त्यांच्या घरावर ईडीच्या 50 रेड झाल्या, सीबीआयच्या 40 झाल्या आणि इन्कम टॅक्सच्या 20 झाल्या. 110 रेड झाल्या. एका व्यक्तीच्या कुटुंबात किती रेड केल्या जातात याचा उच्चांक या देशात कधी घडला नव्हता. तो आज घडला आहे. अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.