मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना सर्व जिल्ह्यांमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर बांधणार असं म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. हिंमत असेल तर मुंब्य्रात मंदिर बांधून दाखवा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा.

मुंब्य्रात महाराजांचं मंदिर बांधण्याच्या फडणवीसांच्या आव्हानावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 8:42 PM

कोल्हापुरात महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिले होते की, तुम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये महाराजांचे मंदिर बांधणार आहात. पण आधी मुंब्र्यात महाराजांचं मंदिर बांधून दाखवा. यावर उत्तर देताना आज उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘देवाभाऊ जाऊ तिथे खाऊ. मुंब्र्यात जा. तिथल्या शिल्पावर आधीच शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले आहे. मुंब्रा ठाणे जिल्ह्यात आहे. तिथला गद्दार फोडला. त्याला मुख्यमंत्री बनवला. त्याच्या जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बनवणं तुम्हाला आव्हान वाटत असेल तर मग मुख्यमंत्री बनवलाच कशाला?’

‘उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई बचाव करणार आहोत. धारावी बचाव करणार आहोत. आम्ही अदानीच्या घशात जाऊ देणार नाहीत. गावठाणे असो की कोळीवाडे असोत त्यांचं अस्तित्व कायम ठेवून कोळी बांधवांच्या मतानुसार विकास करणार आहे. मासे सुकवण्याची सोय किनाऱ्यावर आहे, कोळीवाड्यात आहे. ते काय गच्चीत मासे सुकवाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राचं गुजरातीकरण सुरू आहे. ते थांबवण्यासाठी ही निवडणूक आहे. सर्व गुजरातला नेत आहे.’

‘आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणून हे सर्व प्रश्न षंडासारखे बघत असू तर जगण्याला अर्थ नाही. आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधू. सुरतेला बांधू. मी बोलल्यावर देवाभाऊ बोलले. कारण त्यांना शिवाजी महाराज सहन होत नाही. शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगाची लाहीलाही होते.’

‘आपल्याकडे आयटम बॉम्ब आहे. पलिकडे फुसकुल्या तडतड्या आहेत. चालू द्या. आपण २३ तारखेला विजयी जल्लोष करत आहोत. कालपासून सभा सुरू झाल्या आहेत. काही लोक म्हणाले, की उत्साह दिसत नाही. मी म्हटलं फराळ तर संपू द्या. लोक म्हणाले, महागाई एवढी वाढली फराळ कसं खाणरा. मी म्हणालो, की ठिक आहे. उद्याच्या सभेत आम्ही तेच फटाके फोडणार आहोत.’

‘आम्ही मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. आनंदाचा शिधामध्ये लेंड्या मिळतात. उंदराच्या लेंड्या मिळतात हा आनंद. आम्ही पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवू. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ न देता करणार आहोत. ९० हजार रुपये प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे काढले जात नाही. उद्या श्वास घ्यायलाही टॅक्स लावतील. आपला खिसा मारतात. आणि वरणं योजना येत आहे.’ असं ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.