अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं. काय ठरलं, हे उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत सांगितलं.. त्यानंतर फडणवीसांनीही गौप्यस्फोट केलाय. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाहांसमोरच उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेत असल्याचं मला सांगितलं असा दावा फडणवीसांनी केलाय.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 10:59 PM

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन, अमित शाहांनी बाळासाहेबांच्या खोलीत काय म्हटलं. नेमकं काय ठरलं होतं याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत केला आहे. त्यावर फडणवीसांनीही नवे गौप्यस्फोट केले आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द कुठून आला ? आणि अमित शाह मातोश्रीवर येण्याआधीच कशी चर्चा थांबली हेही सांगितलं.

चर्चा थांबल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंनीच मध्यर्थ्याद्वारे मेसेज पाठवला आणि पुन्हा चर्चा सुरु झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंचा दाव्यावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. स्वत: अमित शाहांसमोर उद्घव ठाकरेंनी मला, मी यू टर्न घेतो असं सांगितलं. आणि शिवसैनिकांना काही तरी मिळाल्यासारखं वाटेल असं पत्रकार परिषदेत बोला, हे उद्घव ठाकरेंनीच सांगितल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे..

जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच होता…तर मग त्यांनी जाहीरसभेतून का सांगितलं नाही, हे आतापर्यंत अमित शाह आणि फडणवीस विचारत होते…पण TV9च्या मुलाखतीतून त्यावर उद्धव ठाकरे बोलल्यानंतर आता 5-6 वर्षांनी सूचलं का असा सवाल फडणवीसांनी केला.

सुरुवातीचे अडीच वर्षे भाजपचेच होते आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्यानं आपण जाहीरसभेतून बोललो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले मग, त्यावेळी माझा फोन का घेतला नाही ?, असा सवाल फडणवीसांनी केलाय.

आपण अडीच वर्षांचा शब्द दिलाच नाही, हे भाजपकडून नाकारलं जातंय. पण आई वडिलांसह उद्धव ठाकरे तुळजाभवनाची शपथ घेत आहेत. TV9च्या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला होता. पुढच्या 6 महिन्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत..पण अजूनही 2019च्या निवडणुकीआधी बाळासाहेबांच्या खोलीतल्या बोलणीवरुन अजूनही खलबतं सुरुच आहे. ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली. पुढे शिवसेनेही फुटली. त्यावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या मुलाखतीतून दोघांच्याही बाजू समोर आल्यात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.