आरक्षणाबाबत मराठा कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात महत्वाची आजपासून सुनावणी असताना, याच पार्श्वभूमीवर काल (5 फेब्रुवारी) मुंबईत मराठा नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. आरक्षण टिकलं तर हे टिकाऊ आरक्षण, असा त्याचा उल्लेख करून जल्लोष केला जाणार आहे. नाही टिकलं तर रस्तावर उतरण्यासाठीची तयारी करण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे. बैठक कुठे झाली आणि कोण उपस्थित […]

आरक्षणाबाबत मराठा कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकीत काय ठरलं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात महत्वाची आजपासून सुनावणी असताना, याच पार्श्वभूमीवर काल (5 फेब्रुवारी) मुंबईत मराठा नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. आरक्षण टिकलं तर हे टिकाऊ आरक्षण, असा त्याचा उल्लेख करून जल्लोष केला जाणार आहे. नाही टिकलं तर रस्तावर उतरण्यासाठीची तयारी करण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे.

बैठक कुठे झाली आणि कोण उपस्थित होते?

ही बैठक मुंबई सेन्ट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या बाबासाहेब गावडे कॉलेजच्या सभागृहात झाली. ही बैठक मराठा महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत पवार , संघाचे नेते वीरेंद्र पवार , कोल्हापूर येथील मराठा नेते आणि याचिकाकर्ते दिलीप पाटील, साताऱ्याचे बापू क्षीरसागर, नाशिकचे तुषार जगताप, सोलापूरचे रवी मोहिते, सांगलीचे प्रशांत भोसले, लातूरचे व्यंकट शिंदे आदी मान्यवरांसह मुंबईतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सुनावणीची परिस्थती पाहून पुढची रणनीती ठरवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणावर आजपासून हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात आजपासून (6 फेब्रुवारी) महत्त्वाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. त्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली याचिका अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची, तर दुसरी याचिका संजित शुक्ला यांनी दाखल केली. मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलंय ते घटनेनुसार नाही. हे आरक्षण अतिरिक्त आरक्षण आहे. यामुळे हे आरक्षण रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. तर या प्रकरणात 27 जणांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याचिका दाखल केली होती. ती त्यांनी मागे घेतली आहे.

मराठा आरक्षण : राज्यातल्या वकिलांना दिल्लीतल्या दिग्गजांची साथ मिळणार

मराठा आरक्षणाच्या बाजूने वकिलांची फौज

हायकोर्टात बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य सरकारतर्फे वरिष्ठ वकिलांची मोठी फौज उभी केली आहे. सुरुवातीपासून राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणाची बाजू अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी, माजी अॅडव्होकेट जनरल विजय थोरात, वरिष्ठ वकील अनिल साखरे हे मांडत आहेत. मात्र, त्यात आणखी दिल्लीतील वरिष्ठ वकील येत आहेत. केंद्र सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील परमजीत सिंग पटवालिया, अॅड. निशांत कटनेश्वरकर हे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बाजू मांडणार आहेत.

ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांना मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने विनंती केली होती. पण त्यांचं फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वेळापत्रक अगोदरच ठरलेलं असल्यामुळे त्यांनी यासाठी असमर्थता दर्शवली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकुल रोहतगी यांना विनंती केली. मुकुल रोहतगी यांच्यासह इतर दिग्गज वकील असतील.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका

आनंद राव काटे

अखिल भारतीय मराठा महासंघ

विलास सुद्रीक

अशोक पाटील

डॉ कांचन पतीलव

सुभाष बाळू सालेकर

पांडुरंग शेलकर

नितेश नारायण राणे

लक्ष्मण मिसाळ

प्रवीण निकम

विपुल माने

विनोद पोखरकर

दिलीप पाटील

संदीप पोळ

विवेक कुराडे

विनोद साबळे

कृष्णा नाईक

अंकुश कदम

संतोष राईजाधव

बाळासाहेब सराटे

अखिल मराठा फेडरेशन

विक्रम शेळके

विठ्ठल घुमडे

सुरेश आंबोरे

राजेंद्र कोंढारे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.