AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो मी नव्हेच…इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणात काय खुलासा, कॉल रेकॉर्डिंगमध्ये मुख्यमंत्र्यानाही ओढले

Historian Indrajeet Sawant Death Threat : सध्या 'छावा'ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर आता नागपूरमधून मोठा खुलासा आला आहे.

तो मी नव्हेच...इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणात काय खुलासा, कॉल रेकॉर्डिंगमध्ये मुख्यमंत्र्यानाही ओढले
इंद्रजीत सावंत
Follow us
| Updated on: Feb 25, 2025 | 10:53 AM

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी याविषयीचे कॉल रेकॉर्डिंग फेसबूकवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सावंत ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कॉल करणाऱ्याने आपण नागपूर येथून बोलत असल्याचा दावा केला. प्रशांत कोरटकर असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे नागपूर येथील प्रशांत कोरटकरच याप्रकरणी समोर आले. त्यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. आपल्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केला.

काय आहे फेसबुक पोस्ट?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. अशा धमक्या आपल्याला नवीन नाही. आपण अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचा दावा सावंत यांनी केला. त्यांनी या पोस्टमध्ये प्रशांत कोरटकर यांचे नाव घेतले आहे. त्यांनी असा कॉल केल्याची माहिती त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कॉल रेकॉर्डमध्ये काय काय?

या कॉल रेकॉर्डमध्ये इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला. आपण नागपूर येथून प्रशांत कोरटकर बोलत असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केला. तर सावंत यांनी आपले नाव गुगलवर शोधण्यास त्याने सांगितले. त्याने सावंत यांना अश्लाघ्य शिव्यांची लाखोली वाहिली. तर ब्राह्मणांची ताकद दाखवून देण्याची धमकी देण्यात आली. तर कॉल करणाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे.

सावंतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला करणार

तर याप्रकरणात नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी आपण इंद्रजीत सावंत यांना ओळखत नाही. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असा दावा त्यांनी केला. नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी 15 वेळा आपले फेसबुक हॅक करण्यात आले. आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा दावा कोरटकर यांनी केला. तर सावंत यानी अगोदर आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करायला हवी होती, असे ते म्हणाले. याप्रकरणी पोलिसांमध्ये आणि सायबर पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे कोरटकर म्हणाले. त्यांनी इंद्रजीत सावंत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला करणार असल्याचा इशारा दिला.

सध्याच्या घडामोडींवर सावंतांचे मोठे भाष्य

‘महाराष्ट्रात अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविलं आहे. पण कधीच कुणी जातीचा गंड दाखवून विधान केलं नव्हतं. ज्या पद्धतीने उन्माद चढलेला दिसत आहे, तो सर्वत्र आहे. सरकारी अधिकारी बोलत नाही, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतो. एखाद्या जातीचं राज्य आलं असं काही लोकांना वाटत आहे, हे पूर्वी कधी घडलं नव्हतं.’ असे भाष्य इंद्रजित सावंत यांनी केले.

या तर चोराच्या उलट्या बोंबा

माझ्याकडे ट्रू कॉलवर जो नंबर आलाय. त्यात त्याने नाव सांगितलं. फेसबुकवर, ट्टिटरवर पोस्ट आहे. उलट चोराच्या उलट्या बोंबा होत आहे, असा आरोप सावंत यांनी केला.  मला धमकी दिली त्याबाबत काही नाही. पण शिवाजी महाराजांबद्दल कोणी बोलत नसेल तर योग्य आहे. जर समोरचा व्यक्ती नाकारत असेल तर मुख्यमंत्री काय करतात हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांनाबाबतचा तो पुरावा काय?

संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाकडे कुणी पकडून दिलं ही मांडणी मी केली. ती पुराव्याच्या आधारे केली. फ्रान्सिस मार्टिनने त्याची डायरी लिहिली आहे. ती प्रसिद्ध आहे. इंग्रजी भाषेत तेव्हाच ती ट्रान्सलेट केली आहे. फ्रान्सिसला मी सांगायलो गेलो नव्हतो की त्यात ब्राह्मणांनी संभाजी राजेंना पकडून दिलं. मी साडेतीनशे वर्षापूर्वी मी गेलो नव्हतो, असे सावंत म्हणाले.  इतिहास मांडताना जसाच्या तसा मांडला पाहिजे. त्यात ब्राह्मण द्वेष नाही. माझे सर्व पुस्तके पाहा. मी पुराव्यासहीत मांडत आलो. मी खरा इतिहास सांगितल्यावर समाजा समाजात द्वेष करतोय असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. माझा नाही, असे स्पष्टीकरण सावंत यांनी दिले.

26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.