VIDEO: 25 वर्षापूर्वी शरद पवार संघ, गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांबद्दल काय म्हणाले?; पवारांच भाषण जसंच्या तसं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा उद्या 81 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आज मुंबईत त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी शरद पवारांचे 25 वर्षांपूर्वीचे एक भाषण वाचून दाखवले. पवारांचं हे भाषण आजही प्रासंगिक असल्याने बागाईतकर यांनी ते वाचून दाखवले. पवारांनी नागपूर […]

VIDEO:  25 वर्षापूर्वी शरद पवार संघ, गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांबद्दल काय म्हणाले?; पवारांच भाषण जसंच्या तसं
sharad pawar
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 3:47 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा उद्या 81 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने आज मुंबईत त्यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी शरद पवारांचे 25 वर्षांपूर्वीचे एक भाषण वाचून दाखवले. पवारांचं हे भाषण आजही प्रासंगिक असल्याने बागाईतकर यांनी ते वाचून दाखवले. पवारांनी नागपूर येथे 18 एप्रिल 1996 रोजी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी हे भाषण केलं होतं. काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या प्रचारसभेतील हे भाषण आहे. या भाषणात त्यांनी गोळवलकर गुरुजी, संघ आणि सावरकरांबद्दलची आपली मते व्यक्त केली आहेत. पवारांचं हे भाषण जसंच्या तसं

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला

विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मांडला जातो. स्वातंत्र्यापासून या भागातील जनतेने काँग्रेसवर मनापासून प्रेम केले आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून दिलं आहे. माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी विदर्भातील जनता त्यांच्या पराभवानंतरही मजबूतीने उभी राहिली. इंदिरांजींवर अलोट प्रेम इथल्या जनतेने केले आहे. त्यांच्या पक्षाचा वारसा व विचार पुढे नेण्याचं काम विलास मुत्तेमवार साहेब आज समर्थपणे करत आहेत. त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि विदर्भातील जनतेने काँग्रेस पक्षावर किती उदंड प्रेम केले आहे हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध करावे. अशी विनंती करण्यासाठी आज मी येथे आलो आहे.

अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष पेरले

नागपूर शहर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक, राजकीय आणि देशाचा केंद्रबिंदू या नात्याने भौगोलिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचं स्थान आहे. हिंदुत्वाचा विचार ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोपासला आणि वाढवला त्या संघाचे मुख्यालयही येथेच आहे. अर्ध चड्डीवाल्यांनी धर्म आणि जातीयतेचे विष माणसामाणसात पेरून या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणली आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी याच नागपूर शहरात डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 1930 पर्यंत ते सरसंघचालक म्हणून राहिले आणि दुसऱ्यांदा 1931 मध्ये ते सरसंघचालक म्हणून निवडून गेले. ते 1940 पर्यंत राहिले. म्हणजे ते जवळपास 15 वर्ष डॉ. हेडगेवार हे संघाचे प्रमुख होते.

1920मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं. त्यानंतर महात्मा गांधींचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग झाला आणि हळूहळून गांधीजींचे नेतृत्व देशभर स्वीकारले जाऊ लागले. संघाची विचारसरणी महात्मा गांधींना कधीच पटली नाही आणि मान्यही झाली नाही. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आणि काँग्रेस संघटनेने जो ब्रिटिशांच्या विरोधात प्रचंड लढा दिला व संघर्ष केला. त्या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कधीही सहभाग नव्हता. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एकही संघवाला कधीही लढला नाही आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या रणांगणात उतरलाही नाही.

सावरकरांनी वारंवार माफीनामे दिले

जो संघ आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गातो. आणि त्यांनाच फक्त देशभक्त मानतो, ते स्वातंत्र्यवीर ब्रिटीशांनी अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सोडावे आणि काळ्यापाण्याच्या शिक्षेतून मोकळीक मिळावी म्हणून वारंवार माफीनामा लिहून देत होते आणि पत्रं देत होते. ज्या सावरकरांना जेलमधून सोडवण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले हे सत्य जनतेला कधीही सांगितलं नाही. खरा इतिहास दडवून ठेवला जात आहे. सावरकरांच्या सुटकेसाठी महात्मा गांधी व्हॉइसरॉयला स्वत: जाऊन भेटले. इतकेच नव्हे तर मुंबईत झालेल्या काँग्रेस संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी ठराव मांडून तो मंजूर करायला लावला. आणि काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही तसा ठराव मंजूर करून घेतला.

महात्मा गांधींच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम आणि सहानुभूती होती. म्हणूनच त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी स्वत: एवढी धडपड केली. इतकेच नव्हे तर कारागृहातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीत जेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. तेव्हा गांधीजी आपली पत्नी कस्तुरबा यांना घेऊन सावरकर आणि त्यांच्या पत्नीला भेटायला रत्नागिरीत गेले होते. दोघांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले. गांधींचं मन किती मोठं आणि उदार होते हे संघवाले कधीही आपल्याला सांगत नाहीत. पण खरा इतिहास संघवाल्यांना दडवता येणार नाही. त्यांना कितीही प्रयत्न करू द्या पण सत्य हे कधी तरी ढळढळीतपणे कधी तरी जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवा

ज्या नागपूर शहरात संघाची स्थापना झाली त्या संघ विचारधारेला नागपूरकर जनतेने कधीच उचलून धरले नाही. संघाच्या शाखा देशभर विस्तारल्या असतील. पण नागपूर आणि विदर्भातील जनतेने काँग्रेसची विचारधारा कायम उचलून धरली आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी केला हे कशाचे लक्षण मानायचे? संघाची विचारधारा पुढे नेण्यासाठी 1951 रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. या जनसंघाचा पुढे भाजपचा झाला. आपली विचारधारा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या आणि स्वभावाच्या माणसांना जाती धर्माचे काम करता यावे म्हणून संघानेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अशा अनेक संघटना स्थापना केल्या.

या सर्वांचे एकच उद्दिष्ट हिंदू धर्माचं संघटन. धर्म एक असला तरी राष्ट्र एक राहू शकते हे खरे नाही. जगातील अनेक देशाची फाळणी एक धर्म असतानाही झाली आहे. त्यामुळे संघ भाजपने नुसता हिंदू हिंदू असा धोशा लावला तर भारतातील इतर धर्माची लोकं वेगवेगळा देश मागितल्या शिवाय राहणार नाही. आपल्याला देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवायची आहे. राष्ट्राची शकले होऊ द्यायची नाही म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे.

गोळवलकरांची भूमिका जातीयवादाला खतपाणी घालणारी

आज जो संघ आणि भाजप समान नागरी कायद्याचा आग्रह करून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करतो. या कायद्याला विरोध करणारी मुलाखत 1972 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी दिली होती आणि ती संघाचेच मुखपत्रं असलेल्या ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झाली होती. हे भाजपच्या नेत्यांना आज आठवत नाही का?

या मुलाखतीत गोळवलकर गुरुजी म्हणाले होते, समान नागरी कायदा करून समानता आणण्याचा अट्टाहास चुकीचा आहे. विविधता हे भारताचे वैशिष्ट्ये आहे. विविधतेबरोबर संवादित्व असावे. समानता असण्याची गरज नाही. पाश्चात्य देशात राष्ट्रवादाबरोबर समान कायदे झाले असले तरी पाश्चात्य देशाची संस्कृती ही फार थोड्यावर्षाची आहे. आपली प्राचीन आहे. पाश्चात्य संस्कृती काल नव्हती, आज आहे. उद्या असणारही नाही. म्हणून तिचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपण समग्र कायद्याचा आग्रह धरू नये, गोळवलकर गुरुजींचा हा इतिहास कमालीचा फसवा आणि धादांत खोटा आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक धर्म, एक ध्वज आणि एक भाषा यांचा पुरस्कार करणार आणि दुसरीकडे मात्र कायदा मात्र समान असू नये असं सांगणार. यातील विसंगती भारतीय संस्कृतीच्या विविधतेचे लक्षण आहे की गोळवलकर गुरुजींच्या एकंदर विचारसरणीचा तो अविभाज्य भाग आहे? याचे उत्तर कोण देणार आणि कधी देणार? काँग्रेसने मुस्लिम जातीयवादाला खतपाणी घातले असा आरोप भाजपवाले करतात. मग मुस्लिमांनी अलगतेने रहावे, त्यांनी स्वत:चे स्वतंत्र वैशिष्ट्ये ठेवावे, त्यांचा नागरी कायदा वेगळा असावा ही गोळवलकरांची भूमिका जातीयवादाला खतपाणी घालणारी नाही का?

ते गोळवलकरांचे दुखणे आहे का?

भारतीय राज्य घटनेला तर संघाने सुरुवातीपासूनच विरोध केला. आपली राज्यघटना ही गुरुजींना अनेक देशांची गोधडी वाटते आणि हिंदू कोड हेही अन्य देशाच्या कायद्याचे बाड वाटते. मग राज्य घटना कशी असावी हे गोळवलकर गुरुजींना का सांगितली नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य होते. आणि अस्पृश्य माणूस राज्यघटना बनविण्याच्या मसुदा समितीचा अध्यक्ष होता हे गोळवलकर गुरुजींचे खरे दुखणे आहे का? कारण गुरुजींचा एकंदरीत दृष्टीकोण सामाजिक परिवर्तनाच्या विरुद्धचा आहे. गुरुजींच्या विचारांची होळी करायला आज आम्ही तयार आहोत, असं म्हणण्याचं धाडस संघ आणि भाजपवाले दाखवणार आहेत का? हा आज माझा त्यांना सवाल आहे.

रिपाइंच्या उमेदवारांना भाजपकडून आर्थिक रसद

गुरुजींनी 1972मध्ये घेतलेली भूमिका चुकीची होती, असं म्हणण्याचे धाडस आजचे सरसंघचालक राजेंद्र सिंहजी दाखवणार आहेत का? भाजपचे कायमच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मतदारांकडून कदापीही होता कामा नये. आज भाजपकडून रिपब्लिकन पार्टीच्या उमदेवारांना पैसा निवडणुकीसाठी पुरवला जात आहे. या मागचे षडयंत्रं तुम्ही समजून घ्या.

रिपब्लिकन पक्षाची व मुस्लिमांची मते परंपरेने काँग्रेसला मिळत आली आहेत. या मतांची विभागणी व्हावी. मुस्लिमांनी रिपब्लिकन पक्षाला मते दिली तर काँग्रेसची मते कमी होतील हा भाजपचा डाव आहे. दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची व्होटबँक आहे. तीच फोडायची असा डाव भाजपने टाकला आहे. यासाठी कोट्यवधीचा निधी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना भाजपकडून पुरवला जात आहे. त्यांचा हा कावा ओळखून त्याला मूठमाती देण्याचं काम मतदारांनी केलं पाहिजे. देशाला सुस्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्षच देऊ शकतो. इतकेच नव्हे तर देशाची एकात्मता टिकवण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेवर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: पवारांनी 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजलं; संजय राऊतांचा भाजपला टोला

Waqf board scam| मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या, त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार; सोमय्यांचा दावा

लालू प्रसाद यादवांनी नव्या सूनबाईचं नाव बदललं; तेजस्वी यादवांच्या पत्नीचं नवं नाव नेमंक काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.