अजित पवार यांच्या बंडानंतर पहिला सर्व्हे, लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कसे असेल चित्र?
शिंदे गट वेगळा झाला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार यांनी दुसरा गट स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला. तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड ठरण्याचा अंदाज सर्व्हेक्षणानं व्यक्त केलाय.
मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर पहीलं सर्व्हेक्षण समोर आलं. या घडीला लोकसभा निवडणुका लागल्या, तर काय चित्र असेल. यासंदर्भात इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स या संस्थेने सर्व्हेक्षण केलंय. कोणाला किती जागा, कोणत्या भागात कोण वर्चड ठरणार. कुणाला किती टक्के मतदान असे अंदाज बांधण्यात आलेत. अजित पवार गट सत्तेत जाऊनही लोकसभेत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्व्हेक्षणात आता निवडणुका झाल्यास आकडे उलटण्याचा अंदाज आहे. भाजपबरोबरच शिंदे गट आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असा सर्व्हेचा अंदाज आहे. २०२२ मध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेत फूट पडली. शिंदे गट वेगळा झाला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवार यांनी दुसरा गट स्थापन करून सत्तेत सहभाग घेतला. तरीही महाविकास आघाडीचे पारडे जड ठरण्याचा अंदाज सर्व्हेक्षणानं व्यक्त केलाय.
२०१९ मध्ये भाजपला २३, शिवसेनेला १८, राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती. मात्र, आता निवडणुका झाल्यास एनडीएतील भाजपला २०, शिंदे गटाच्या शिवसेनेला २ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
शिंदे गटाच्या ११ जागांवर फटका
मात्र, इंडिया संघटनेतील ठाकरे गटाच्या शिवसेनेला ११, काँग्रेसला ९ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. राज्यातील लोकसभेच्या भाजपच्या तीन जागा कमी होतील. शिंदे गटाच्या ११ जागांवर फटका बसेल.
काँग्रेसला मोठा फायदा होणार
ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे ५ खासदार असले, तरी लोकसभा निवडणुका आता झाल्यास त्यांचा फायदा होईल. सहा जागा जास्त मिळतील, असा सर्व्हेक्षणाचा अंदाज आहे. काँग्रेसकडे सध्या एक जागा आहे. पण, आता निवडणुका झाल्यास त्यांना तब्बल ८ जागांचा फायदा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही निवडणुका झाल्यास फायदा होणार असल्याचं सर्व्हेक्षण सांगतं.
विदर्भात दहा जागा आहेत. २०१९ मध्ये १० पैकी ८ जागा शिवसेना-भाजपकडे होत्या. पण, आता निवडणुका लागल्यास पाच जागा युतीला तर पाच जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा अंदाज आहे.