ईडीच्या चौकशीत काय विचारलं…रोहित पवार यांनी सांगितला सर्व घटनाक्रम

Sanjay Raut on ED | आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी बुधवारी झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ही चौकशी झाली. या बँकेवर काही राजकीय नेते संचालक होते. त्यांच्याविरोधात 2018 साली अण्णा हजारे आणि इतर काही समाजसेवक न्यायालयात गेले होते.

ईडीच्या चौकशीत काय विचारलं...रोहित पवार यांनी सांगितला सर्व घटनाक्रम
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 12:58 PM

सुनिल जाधव, ठाणे, दि.25 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी बुधवारी झाली. तब्बल ११ तास ही चौकशी सुरु होती. आता पुन्हा १ फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीत काय विचारणा झाली ? त्यासंदर्भात रोहित पवार यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात ही चौकशी झाली. या बँकेवर काही राजकीय नेते संचालक होते. त्यांच्याविरोधात 2018 साली अण्णा हजारे आणि इतर काही समाजसेवक न्यायालयात गेले होते. यावेळी काही चुकीच्या गोष्टी राजकीय नेत्यांकडून झाल्या आहेत. या प्रकरणात माझे नाव देखील नाही. त्यानंतर आपण तपास संस्थांना सहकार्य करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

तपास संस्थांना सहकार्य

ईडी बँकेच्या या प्रकरणात काही कागदपत्रे हवी होती. ती सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. सर्व प्रकारची मदत आम्ही ईडीला करत आहोत. अधिकारी त्यांचे काम करतात, त्यांना लागणारी सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. तपास संस्थांना सहकार्य करण्याची भूमिका आमची कायम आहे. माझी चौकशी सुरु असताना पवार साहेब स्वतः दहा-अकरा तास होते. यावरूनच साहेब कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असतात, हे स्पष्ट आहे.

महाराष्ट्रातून हजारो लोक आले

माझी ईडी चौकशी सुरु असताना ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोक आले. राज्यभरातून आलेल्या लोकांनी मला पांठिबा दिला. जनता आमच्या बाजूने असल्याचे त्यातून समोर येत आहे. महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्वी लढत होतो. तसेच आज पण आणि उद्या पण मी लढणार आहोत.

हे सुद्धा वाचा

पवार साहेब चिंतत होते पण

पवार साहेब मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख म्हणून आणि बाप माणूस म्हणून आले होते. आम्हाला काही अडचण आली तर सोडता यावी, यासाठी ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. चौकशी सुरु असताना शरद पवार थोडे चिंतेत होते. तरीसुद्धा कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांनी पाठबळ ते देत होते.

स्वाभिमानी महाराष्ट्रात जे चालले आहे, ते चुकीचे आहे. महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी गुजरात विकास काही लोक करत आहेत. हिच लोक सत्तेत हेत. त्यांना आम्ही आधी विरोध केला आताही करणार आणि उद्याही करणार… असा इशारा रोहित पवार यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.