देशात एका दिवसात एक कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, यात कसला मोठेपणा?; नवाब मलिकांनी भाजपला सुनावले
देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही, असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
मुंबई : देशात दरदिवशी एक कोटी कोरोनावरील लसी उपलब्ध झाल्या पाहिजेत तर महाराष्ट्रात दरदिवशी 20-25 लाख लोक लसीच्या दुसर्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. (Whats the big deal in One crore vaccinations completed in single day, Nawab Malik slams BJP)
देशात एका दिवसात एक कोटी लसींचा टप्पा पूर्ण करण्यात आला, तसाच महाराष्ट्रात एका दिवसात 11 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्य सरकारला गरजेचा आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
पुणे शहरात 30 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण!
पुणे (Pune) शहरानं कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) मोहीमेत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत 30 लाख 46 हजार 995 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आज एका दिवसात 63 हजार 993 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. पुणे महानगरपालिकेनं याबाबत माहिती दिली आहे.
एका दिवसात एक लाखाहून अधिक लसीकरण
पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एक लाख 15 हजार जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्यांदा लसीकरणाने एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात लसीकरणाने ७७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे.
घरी लसीकरणासाठी कसा करणार अर्ज?
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी bedriddenvaccination.pune@gmail.com या ईमेलवर ऑनलाईन अर्ज करणाचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
इतर बातम्या
पुणे शहरात 30 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण! एका दिवसात 64 हजार नागरिकांना लस
दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ
Mumbai Vaccination | मुंबईत आजपासून लसीकरण सुरु, राजावाडी रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी रांग
(Whats the big deal in One crore vaccinations completed in single day, Nawab Malik slams BJP)