Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर

मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने वर्तवला आहे. (When Mumbai Corona Cases will decline )

Mumbai Corona Cases | मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार; दिलासादायक माहिती समोर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:45 AM

मुंबई : मुंबईतील कोरोनाचा कहर केव्हा थांबणार, याविषयी दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट न आल्यास मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने वर्तवला आहे. (When Mumbai Corona Cases will decline TIFR Research has an answer)

लॉकडाऊननंतर कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन सुरु आहे. एप्रिलपासून ब्रेक द चेन मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे.

रुग्णवाढीचा वेग आणि पॉझिटिव्हिटी रेट घटला

गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग आणि पॉझिटिव्हिटी रेट घटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. शहरातील लसीकरण कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु राहिले, आणि कोरोनाचा कोणताही नवा व्हेरिएंट आला नाही, तर मुंबईतील परिस्थिती जूनपर्यंत सर्वसामान्य होईल, असा अंदाज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने वर्तवला आहे.

…तर एक जुलैपासून शहरातील शाळा सुरु

मुंबईत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं गणिती प्रारुपाच्या मदतीने विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी ही भविष्यवाणी केली आहे. जूनमध्ये शहरातील परिस्थिती सामान्य होईल. एक जुलैपासून शहरातील शाळा सुरू करता येतील, अशी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

लोकल पुन्हा सुरु केल्याने फैलाव

फेब्रुवारीत राज्यात कोरोना विषाणूचा एकच व्हेरिएंट होता. मात्र लोकल सेवा सुरू करण्यात आल्याने विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. लोकल सेवा आणि अन्य गोष्टी सुरू होताच कोरोना विषाणूच्या फैलावासाठी पोषक वातावरण तयार झालं. त्यामुळेच शहरात दुसरी लाट आली, असं निरीक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

फेब्रुवारीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निर्बंध बरेच शिथिल करण्यात आले. त्यामुळेच मार्च महिन्यात परिस्थिती गंभीर झाली, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरिएंट गेल्या वर्षी आढळून आलेल्या स्ट्रेनपेक्षा दोन ते अडीच पट अधिक संक्रामक आहे.

मार्च महिन्यातील आकडेवारी काय?

मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला. नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा फैलाव वेगाने झाला असावा, असं शास्त्रज्ञ म्हणाले. सरकारी आकडेवारीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 2.3 लाख जणांना लागण झाली. तर एप्रिलमध्ये 1 हजार 479 जणांचा मृत्यू झाला. (When Mumbai Corona Cases will decline )

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा कहर, 15 दिवसात 50 लाख बाधितांची वाढ

(When Mumbai Corona Cases will decline )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.