TV9 Marathi Exclusive | हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीला आतापर्यंत काय काय मिळाले पुरावे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाला अनेक पुरावे मिळाले आहेत. ईडीला मिळालेले महत्वाचे पुरावे टीव्ही ९ मराठीला मिळाले आहेत. या पुराव्यामुळेच मुश्रीफ यांची अडचण वाढली आहे.

TV9 Marathi Exclusive | हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीला आतापर्यंत काय काय मिळाले पुरावे?
hasan mushrif
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 4:23 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा जामीन अर्ज फेटाळला. परंतु उच्च न्यायालयात जाण्यासाठी सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांना तीन दिवसांचा वेळ दिला आहे. न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 14 एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. अंमलबजावणी संचालयास (ED) मुश्रीफ यांच्यांविरोधात काय पुरावे मिळाले, त्याची Exclusive माहिती TV9 Marathi ला मिळाली आहे.

काय पुरावे मिळाले

हे सुद्धा वाचा

2011 साली हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीतून साखर कारखाना सुरू करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट देऊन लोकांकडून प्रत्येकी 10 हजार जमा करण्याच्या सूचना दिल्या. 2012 पासून पुढील 2 ते 3 वर्षात मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून तब्बल 37 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती. त्यांनी लोकांकडून पैसे घेताना कारखान्यात भागीदार करण्याचे आमिष दाखवले होते. परंतु वर्गणी देणाऱ्यांना कोणतही सर्टिफिकेट देण्यात आले नाही.

भागीदार केले नाही, साखर दिले नाही

विशेष म्हणजे कारखाना सुरू झाल्यावर मुश्रीफ यांनी प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला 5 किलो साखर देऊ अस सांगितलं होतं. त्याची मोठी जाहिरातबाजी वर्तमानपत्रांमध्ये केली गेली. परंतु  शेतकऱ्यांना साखर दिली नाही. यामाध्यमातूनही मुश्रीफ यांनी जनतेची फसवणूक केली, असा दावा ईडीने केला आहे.

मुश्रीफ अन् कुटुंबियांनी कट रचला

ईडीने 10 जानेवारीला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय घाटगे यांचा जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी 2011 ते 2015 या काळात शेतकऱ्यांकडून 20 कोटी रोख रक्कम आणि 5 कोटी चेकच्या माध्यमातून जमा झाल्याचं ईडीला सांगितलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी ईडीच्या चौकशीत शेतकऱ्यांकडून 37 ते 38 कोटी रुपये जमा झाल्याचं ईडीला सांगितले. ईडीच्या तपासानुसार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून एक कट रचला. त्यात गरीब शेतकऱ्यांकडून पैसे उकळून स्वतःचा व्यवसाय वाढवला, असा आरोप ईडीने केलाय.

दीर्घकाळ चालली सुनावणी

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर गेल्या चार आठवड्यांपासून सेशन्स कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता. त्यानंतर कोर्टाने आज हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय. परंतु अटक करण्यास तीन दिवसांची स्थगिती देत मुश्रीफ यांना थोडा दिलासा न्यायालयाने दिला आहे.

हे ही वाचा

Hasan Mushrif | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ का आले अडचणीत? ED ने काय केले आरोप?

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.