कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कोण करतेय?, सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं
कंबोजनी ट्वीट करू नये. राणेंनी लगेच पत्रकार परिषदा घेऊ नये, असा सल्ला अंधारे यांनी दिला.
दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळाली. त्यानंतर शिवसेनेनं आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सदा सरवणकर हे खुलेआम गोळीबार करतात. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. नारायण राणे म्हणतात मी हे मुश्कील करीन, मी ते मुश्कील करीन. ही गुंडगिरीची भाषा करणारे कोण?, प्रकाश सुर्वे हा कुणाचा आमदार. तो हातपाय तोडातोडीची भाषा करतो. त्यामुळं सदा सरवणकर, नारायण राणे, प्रकाश सुर्वे यांना लगाम घालण्यात सत्ताधारी कमी पडतात, असा आरोप त्यांनी केला.
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची पकड ढिली होते. गृहमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी झटकताय. तुम्हाला प्रशासनावरची पकड जमलेली नाही. याचा अर्थ सर्व काम मुख्यमंत्रीच करतात का, असा सवालही अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, श्रद्धा आणि संयम या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पालिकेच्या आडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. चेंगराचेंगरीची घटना घडली नाही. बीकेसीच्या मैदानात तो निर्माण होणार नाही का? बीकेसीचं मैदान घेऊन शिवाजी मैदान मागणे ही विकृती आहेत.
दसरा मेळाव्याला विरोध करून एकनाथ शिंदे हे विरोध दर्शवित आहेत. कंत्राटी पद्धतीनं बोलणारी लोकं बोलतात. दादा हो, राजे हो सगळ्या चॅनचे लाईव्ह चाललं त्यावरील कमेंट्स वाचा. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया कळतील. शिवसेना संपलेली नाही.
शिवसेना संपली म्हणता तर, गर्दी किती जमते ते पाहा. अलिबाबांनी आमदार फोडले. ४० चोर सोबत गेले. आमदार फोडू शकलो. पण, तळागळातले लोकं फोडू शकलो नाही. हे लोकं अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत.
सदा सरवणकर यांचा कोणताही संबंध नाही, असं कोर्टानं म्हटलं, न्यायदेवतेनंच हे सांगितलं. कंबोजनी ट्वीट करू नये. राणेंनी लगेच पत्रकार परिषदा घेऊ नये, असा सल्ला अंधारे यांनी दिला. पालिकेनं केलेला युक्तिवाद हा सत्तेवर असलेल्यांच्या इशाऱ्यावर चालत होतं, असं वाटतं.
दरवर्षी शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी देणारी पालिका, यावर्षी परवानगी देण्यासाठी कारण पुढं करते. ईडी, सीबीआयचा दुरुपयोग करता, तसं पालिकेचा सत्ताधारी दुरुपयोग करतात, असा आरोप त्यांनी केला.