कोण आहेत मुकेश अंबानी यांचे राईट हँड, रिलायन्स इंडस्ट्रीमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती

मुकेश अंबानी आपल्या जवळच्या व्यक्तींना देखील खूप जपतात. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक त्यांचं वर्गमित्र कोण आहेत. ज्यांना मुकेश अंबानी १५०० कोटींचं घर गिफ्ट केलंय.

कोण आहेत मुकेश अंबानी यांचे राईट हँड, रिलायन्स इंडस्ट्रीमधील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 3:56 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश होतो. मुकेश अंबानी यांच्या प्रत्येक या चर्चेत असतात. आता अशी माहिती पुढे आली आहे की, मुकेश अंबानी यांनी आपला राईट हँड असलेले मनोज मोदी यांना तब्बल 1500 कोटींचे घर भेट म्हणून दिले आहे. पण मनोज मोदी हे कोण आहेत याबाबत खूपत कमी लोकांना माहित असेल. मुकेश मोदी हे कोणी सामान्य व्यक्ती नसून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचे सर्वात विश्वासू तसेच वर्गमित्र आहेत. कॉलेजमध्ये ते दोघेही एकत्र शिकले आहेत. त्यांनी रिलायन्ससाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले आहे आणि मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी रिलायन्सचे नेतृत्व करत होते तेव्हापासून ते रिलायन्सचे कर्मचारी आहेत.

मुकेश अंबानी यांचे बॅचमेट

रिलायन्स ग्रुपचे साम्राज्य उभे करण्यामागे एक अनामिक व्यक्ती आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. रिलायन्स ग्रुपच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका असते. ही व्यक्ती म्हणजे मनोज मोदी. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे बॅचमेट आहेत. मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कॉलेजच्या दिवसांपासून दोघांची मैत्री आहे. भारतीय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा माणूस म्हणजे मनोज मोदी. मनोज मोदी मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. ते देखील करोडोच्या आलिशान घरात राहतात.

1500 कोटी रुपयांचं घर

मुकेश अंबानी यांनी त्यांना भेट दिलेल्या वास्तूचे नाव वृंदावन ठेवण्यात आले आहे. हे घर मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधले आहे. नेपियन सी रोड हा मुंबईचा सर्वाग पॉश एरिया आहे. ही इमारत 1.7 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली आहे. प्रीमियम ठिकाणी ही 22 मजली इमारत बांधली असून घराचा प्रत्येक मजला 8000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.

7 मजले फक्त कार पार्किंगसाठी राखीव आहेत. इतकेच नाही तर येथे करण्यात आलेले फर्निचरचे काम ही खूप खास आहे. ज्यासाठी इटलीतून खास आयात करण्यात आले आहे. या मालमत्तेची किंमत 1500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत मनोज मोदी

मुकेश अंबानी यांचे बॅचमेट असलेले मनोज मोदी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला रिलायन्स ग्रुपमध्ये आले होते. मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे अनेक दशकांपासून मित्र आहेत. ते आता मुकेश अंबानी यांची मुले आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत काम करत आहेत. मनोज मोदी यांनी एप्रिल 2020 मध्ये फेसबुकसोबत जिओच्या करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

जेव्हा जग कोविड-19 महामारीशी झुंजत होते, तेव्हा आकाश अंबानीच्या नेतृत्वाखालील जिओने फेसबुकसोबत सुमारे 43,000 कोटी रुपयांचा करार केला होता. हा करार पूर्ण करण्यासाठी मनोज मोदी आणि आकाश अंबानी या दोघांनी एकत्र काम केले.

झगमगत्या दुनियेपासून लांब

मनोज मोदी हे झगमगत्या दुनियेपासून लांब राहणं पसंत करतात. त्यांची वैयक्तिक माहिती फारशी उपलब्ध नाही. मनोज मोदी यांचा पगार आणि एकूण संपत्ती याबाबत कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ​​कोणतेही नियुक्त सीईओ नाहीत. पण मनोज मोदी हे या पदाच्या बरोबरीचे काम करतात. मनोज मोदी सध्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचे संचालक आहेत.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.