…मग कोसळलेला पूल कुणाचा? जबाबदारी कुणाची?
मुंबई : सीएसएमटीबाहेरील पूल दुर्घटनेची जबाबदारी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन अशा दोघांनीही झटकली आहे. दोन्ही प्रशासन म्हणत आहेत की, पूल आमचा नाही. त्यामुळे पूल नेमका कुणाचा, जबाबदारी कुणाची, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे […]
मुंबई : सीएसएमटीबाहेरील पूल दुर्घटनेची जबाबदारी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन अशा दोघांनीही झटकली आहे. दोन्ही प्रशासन म्हणत आहेत की, पूल आमचा नाही. त्यामुळे पूल नेमका कुणाचा, जबाबदारी कुणाची, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील (CSMT) पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मुंबईचे महापौर काय म्हणाले?
घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. तो पादचार पूल रेल्वेचा होता आणि मेन्टेनन्स मुंबई महानगरपालिका करत होती. सदर पुलाच्या पुनर्बांधणीकरता आणि मेन्टेनन्सकरता सातत्याने रेल्वेकडे पाठपुरावा केला, एनओसी मागितली. रेल्वेकडून एनओसी मिळाली नाही, त्यामुळे त्या पुलाची दुरुस्ती करणं शक्य झालं नाही. त्याला पूर्णत्वाने रेल्वे जबाबदार आहे.
VIDEO : पाहा मुंबईचे महापौर नेमके काय म्हणाले?
मध्य रेल्वेचे पीआरओ काय म्हणाले?
कोसळलेला पूल रेल्वेने बांधलेला नाही. हा पूल रेल्वेच्या जागेच्या बाहेर आहे, सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरचा पूल आहे. रेल्वेचा पूल नाहीय, हे आधीच मी स्पष्ट करतो. रेल्वेच्या बाहेर असूनही तेथील स्थानिक प्रशासनाला जे काही सहकार्य लागेल, ते सर्व करु. आमचे कर्मचारी, अॅम्ब्युलन्स, डॉक्टर सर्व तिथे जवळच आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सर्व मदत करु. रेल्वेच्या बाहेरचा ब्रिज आहे. रेल्वेच्या आतील नाही.
VIDEO : पाहा मध्य रेल्वेचे पीआरओ नेमके काय म्हणाले?
संबंधित बातम्या :
IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट
आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे
ऑडिटनंतरही पूल कोसळला, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री