महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला

Mahavikas Aaghadi CM : महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून रस्सीखेंच सुरू आहे. प्रत्येक गटाची त्यांच्या नेत्याला CM म्हणून जाहीर करण्याची स्पर्धा लागली आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी दोनदा या पदाची घोषणा करण्याची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 4:54 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच सूरू आहे. प्रत्येक घटक पक्ष त्याच्या नेत्याचा गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ अडकवून मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी दोनदा हा विषय मांडला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची विनंती केली. पण इतर दोन पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? त्याची निवड कशी होईल, यावर मोठे भाष्य केले आहे.

लोकसभेप्रमाणेच विधानसभेला मोठे यश

पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत आम्ही अगोदरच 32 जागा निवडून येतील असा अंदाज बांधला होता. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकून हा दावा खरा करून दाखवला. आता विधानसभेला पण महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने जुन्या चुका टाळल्या. इंडिया आघाडीची स्थापना हे त्याचे द्योतक असल्याचे ते म्हणाले. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण?

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिले. जो पक्ष सर्वात मोठा असतो, त्याचा मुख्यमंत्री होतो, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे ते म्हणाले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना याच फॉर्म्युला आधारे मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेव्हा शिवसेना हा मोठा पक्ष होता. येथे विरोधक मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नसल्याचे त्यांनी सांगितले. याविषयीचा निर्णय काँग्रेस नेतृत्व आणि राहुल गांधी घेतील असे त्यांनी सांगितले.

एकत्रित लढणार निवडणूक

महाविकास आघाडीतील मतभेदावर त्यांनी मन मोकळं केलं. ते म्हणाले की तीनही पक्ष एकच अजेंडा, एकच रणनीतीवर काम करतील. त्याआधारे निवडणुकीच्या मैदानात उतरली. महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी त्यांनी बाजू मांडली. मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत विविध प्रदेशातील मुद्दे समोर करत त्यांनी काँग्रेसचा स्ट्राईक रेट कसा वाढला याची माहिती दिली.

लाडकी बहीण योजना तर आमची आयडिया

महिलांना आर्थिक लाभ देण्यासंबंधीच्या योजनांची कल्पना तर काँग्रेसची होती. मध्यप्रदेशात काँग्रेसने पहिल्यांदा त्याची घोषणा केली. पण शिवराज सिंह चौहान यांनी ती लागलीच लागू केली. हिमाचल आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसने अशी योजना आणल्याचे ते म्हणाले. अशा योजनांचे त्यांनी स्वागत केले. सत्तेत परतलो तर ही योजना पुढे चालू ठेवण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. महाविकास आघाडी विधानसभेत मोठे यश मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.