कॉम्रेड गोंविद पानसरे यांची हत्या का झाली? कुटुंबियांनी केला खळबळजनक दावा
Combred Govind Pansare: मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडूनही मुख्य मारेकरी अद्याप मोकाटच का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. तसेच यावेळी गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांकडून नवे पुरावे हायकोर्टात सादर करण्यात आले. दुसरीकडे खटला जलदगतीने निकाली काढण्याकरता आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
मुंबई, दि. 15 फेब्रुवारी 2024 | कॉम्रेड गोंविद पानसरे (Combred Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणास नऊ वर्ष होत आली आहे. या प्रकरणाचा तपास अजून पूर्ण झाला नाही. या प्रकरणाच्या तपासाची माहिती मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) देण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासासंदर्भात नाराजी व्यक्त केली. गुरुवारी सुनावणी दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांचा हायकोर्टात खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले म्हणूनच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली.
यामुळे दिला एटीएसकडे तपास
20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांची कोल्हापूर शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला सीआयडीकडे देण्यात आला. परंतु सीआयडीकडून योग्य तपास करत नाही. यामुळे गेल्यावर्षी हा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे यांच्या कुटुंबियांनी केली. त्यानुसार एटीएसकडे तपास देण्यात आले. परंतु दहशतवाद विरोधी पथकाचा तपास जैसे थे सुरूच आहे. यामुळे चार आठवड्यांत पुढील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
मुख्य मारेकरी अद्याप मोकाटच का?
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडूनही मुख्य मारेकरी अद्याप मोकाटच का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला. तसेच यावेळी गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांकडून नवे पुरावे हायकोर्टात सादर करण्यात आले. दुसरीकडे खटला जलदगतीने निकाली काढण्याकरता आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
कशी झाली हत्या
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा देवी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंदे पानसरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ रोजी अटक झाली होती.