रतन टाटा यांच्या टाटा समूहाची 3800 कोटी रुपयांची संपत्ती, उत्तराधिकारी म्हणून कुणाची नावे चर्चेत?

86 वर्षांचे रतन टाटा यांच्या संपत्तीचे खरे वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण आहेत? अशी चर्चा वारंवार होत असते. रतन टाटा यांच्या मालकीचा टाटा समूह हा तब्बल 3800 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्या या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल किंवा टाटा समूहाची कमान पुढे कोण सांभाळेल? अशी चर्चा नेहमी होत असते.

रतन टाटा यांच्या टाटा समूहाची 3800 कोटी रुपयांची संपत्ती, उत्तराधिकारी म्हणून कुणाची नावे चर्चेत?
Ratan Tata
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 10:32 PM

देशाचे सर्वश्रेष्ठ उद्योगपतींपैकी एक असलेले रतन टाटा यांचं काम खूप मोठं आहे. रतन टाटा यांच्या टाटा समूहाने विविध क्षेत्रांमध्ये मोठं काम केलं आहे. टाटा समूहाने फक्त उद्योग, व्यवसाय केला नाही, तर सामाजिक बांधिलकी देखील जपली. रतन टाटा यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे, दानधर्मामुळे त्यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावर देशातील नागरिकांचं प्रचंड प्रेम आहे. टाटा समूहाचं जगभरात मोठं नाव आहे. टाटा समूहाची संपत्तीदेखील खूप आहे. असं असलं तरीही रतन टाटा यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे 86 वर्षांचे रतन टाटा यांच्या संपत्तीचे खरे वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण आहेत? अशी चर्चा वारंवार होत असते. रतन टाटा यांच्या मालकीचा टाटा समूह हा तब्बल 3800 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्या या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असेल किंवा टाटा समूहाची कमान पुढे कोण सांभाळेल? अशी चर्चा नेहमी होत असते.

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचं नाव नेहमी पुढे येतं. नोएल टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. तसेच ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांचे कौटुंबिक नातेसंबंध त्यांना भविष्यकाळात टाटा समूहाचा सर्वेसर्वा बनण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. त्या तीनही मुलांना टाटा समूहाचे आगामी उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं. यामध्ये माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे.

माया टाटा या 34 वर्षांच्या आहेत. त्या टाटा समूहात महत्त्वपूर्ण काम करत आहेत. माया टाटा यांनी बेयज बिझनेस स्कूल आणि यूनिवर्सिटी ऑफ वॉरविक येथून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी टाटा अपॉर्चुनिटीज फंड आणि टाटा डिजीटलमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. टाटा न्यू एपला लाँच करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

नेविल टाटा हे 32 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या किर्लोस्कर कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्या सोबत झालं आहे. ते ट्रेंट लिमिटेच्याच्या माध्यमातून प्रमुख हाइपरमार्केट चेन स्टार मार्केटचे प्रमुख आहेत. तर 39 वर्षांच्या लिया टाटा या तीनही भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी टाटा समूहात हॉस्पिटिलिटी सेक्टरमध्ये मोठं काम केलं आहे. तसेच त्यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेसमध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्या इंडियन हॉटेल कंपनीचे कामकाज पाहतात.

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.