BMC eletion 2022 Ward 57 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 57 मध्ये कोण मारणार बाजी? शिवसेना-काँग्रेस एकत्र आल्यास संधी?

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 57 विषयी जाणून घेऊयात. या प्रभागात भाजपाने गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता. तर दुसऱ्यास्थानी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. तिसऱ्या स्थानी शिवसेना होती. 

BMC eletion 2022 Ward 57 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 57 मध्ये कोण मारणार बाजी? शिवसेना-काँग्रेस एकत्र आल्यास संधी?
भाजपाला रोखण्याचे आव्हानImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 3:05 PM

मुंबई– राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई महापालिका (BMC Elections )निवडणुकांकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. शिवसेनेतील बंडखोरी, त्यानंतर राज्यात स्थापन केलेले नवे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार, त्यात असलेला भाजपाचा (BJP)सहभाग. सुप्रीम कोर्टात या सगळ्याला देण्यात आलेले आव्हान, या सगळ्यांचा परिणाम आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी करो वा मरोची राहणार आहे. शुवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि भाजपाकडून आशिष शेलार या दोघांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली असेल. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता मुंबई महापालिका निवडणुका जिंकून शिवसेनेला अधिक कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल हे नक्की. त्यामुळेच ही निवडणूक चुरशीची असेल यात काही शंका नाही. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 57 विषयी जाणून घेऊयात. या प्रभागात भाजपाने गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता. तर दुसऱ्यास्थानी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. तिसऱ्या स्थानी शिवसेना होती.

वॉर्ड क्रमांक 57 विषयी

उत्तरेकडे महात्मा गांधी एक्स्टेंशन रोड, पूर्वेकडे लिंक रोड आणि पश्चिमकेडे बांगूर नगर क्रीकपर्यंत या प्रभागाचा विस्तार आहे. बांगूर नगर आणि भगतसिंग नगर हे या प्रभागातील महत्त्वाचे भाग आहेत. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ही 57477 इतकी आहे. एससी लोकसंख्या 5454 आणि एसटी लोकसंख्या 385 इतकी आहे.

गेल्या निवडणुकीत काय झाले होते.

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण महिला असा हा वॉर्ड होता. गेल्या निवडणुकीत या ठिकाणाहून 10 जण रिंगणात होते. त्यात चार अपक्ष होते. भाजपाच्या श्रीकला पिल्ले, शिवसेनेच्या प्रमिला शिंदे, मनसेच्या रेखा इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिता कारंदे तर काँग्रेसकडून माधवी राणे या रिंगणात होत्या. या निवडणुकीत भाजपाच्या श्रीकला पिल्लई यांनी विजय मिळवला होता.

हे सुद्धा वाचा

नगरसवेक 2017

2017 साली भाजपाच्या श्रीकला पिल्ले यांनी विजय मिळवला होता.

यावेळी काय होण्याची शक्यता

2017 च्य़ा निवडणुकीत भाजपाच्या श्रीकला पिल्ले यांनी 10444 मते मिळवली होती. शिवसेनेच्या प्रमिला शिंदे यांनी 4764 , काँग्रेसच्या माधवीताई राणे यांनी 5289 मते घेतली होती. मनसेच्या रेखा इंगोले यांना 480 तेर राष्ट्रवादीच्या सुनीता कारंडे यांना 489 मते मिळाली होती. एकूण गेल्या मतदानानुसार भाजपाला जास्त मते मिळाली होतीच, मात्र दुसऱ्या स्थानी काँग्रेस होती. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपापुढे आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकीय पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...