यूपीए काळात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने महागलं तरी तांडव करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प का? राष्ट्रवादीचा सवाल

यूपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल- डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

यूपीए काळात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने महागलं तरी तांडव करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प का? राष्ट्रवादीचा सवाल
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 4:03 PM

मुंबई : यूपीए सरकारच्या काळात एक रुपयांनी पेट्रोल- डिझेल महाग झाले तर तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.  (why bjp is quiet about Petrol Diesel Price hike, NCP raised question)

मोदीसरकारच्या काळात पेट्रोल – डिझेल व गॅस दरवाढ भरमसाठ झाली आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवर एक्साईज ड्युटी दिडशे टक्क्यांनी वाढवली आहे. मात्र युपीए सरकारमध्ये आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत सर्वाधिक असतानादेखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कुशल आर्थिक धोरणामुळे पेट्रोल डिझेल व गॅसची किंमत कमी ठेवली होती, याची आठवणही महेश तपासे यांनी भाजपला करुन दिली आहे.

महाराष्ट्रात आता गॅसवर सबसिडी मिळणं बंद झालं आहे. पेट्रोल डिझेलने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास सहा महिन्यात 190 रुपयांची दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. भाजपने स्वतःची नैतिकता विसरुन भांडवलशाहीचे राजकारण देशात सुरू केले आहे, असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

पुण्यात पेट्रोलचं शतक

इंधन दरवाढीने (Fuel Prices) सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार वाढला आहे. मागच्या तीन ते चार महिन्यात ठराविक अंतराने देशातले पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) भाव सातत्यानं वाढत गेले. पुण्यात पेट्रोलनं पहिल्यांदा शंभरी पार केली.

सीएनजीचे दर वाढले

पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत्या किंमतींमुळे अनेक वाहनचालक सीएनजीला (CNG) प्राधान्य देताना दिसत आहेत. पण ऑगस्ट महिन्यात सीएनजीचे दर 90 पैशांनी वाढले आहेत. 2 ऑगस्टला सीएनजीचे दर वाढले होते. त्यानंतर मात्र, दर स्थिर आहेत.

24 ऑगस्टनंतर इंधनादरांत बदल नाही

17 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान एकदाही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. याऊलट याकाळात चार वेळा डिझेलच्या दरात काही पैशांची कपात झाली होती. त्यानंतर दर स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार पहायला मिळाला आहे. पण 24 ऑगस्टनंतर इंधनाच्या दरांमध्ये कसलेही बदल झालेले नाहीत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

इतर बातम्या

निलेश राणेंची करेक्ट कार्यक्रमाची धमकी, राऊतांच्या सुरक्षेत वाढ, 6 शस्त्रधारी जवानांचं सुरक्षा कवच; घराला छावणीचं स्वरुप

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

(BJP Were protesting when petrol, diesel became expensive by one rupee during UPA govt, why BJP is silent now? asked by NCP)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.