छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटी मागील गुढ उकलले, कारण सांगत म्हणाले…आता तुम्ही पुढाकर घेतला पाहिजे….
chhagan bhujbal meet sharad pawar: राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रमुख यांची छगन भुजबळ यांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीमागील कारण भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले. भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांची वेळ न घेता सकाळी मी गेलो होतो. परंतु पवार साहेब झोपले होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे एक ते दीड तास थांबलो. ते उठल्यावर त्यांनी मला बोलवले. त्यांच्याशी दीड तास चर्चा झाली. मी त्यांना स्पष्ट केले की, मी राजकारण घेऊन आलो नाही, मंत्री म्हणून आलो नाही. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण देण्याचे काम तुम्ही केले. परंतु आता समाजासमाजात वितृष्ट आले आहे. यासंदर्भातील राज्यातील परिस्थिती त्यांना सांगितली. आता तुम्ही पुढाकर घेतला पाहिजे. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन-चार लोकांना सोबत घेऊन या विषयावर चर्चा करु, असे ठरल्याचे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तेव्हा मराठवाडा तुम्ही शांत केला…
राज्यातील काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे. त्यांना आठवण करून दिली. बाबासाहेबांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना असाच मराठवाडा पेटला होता. तेव्हा मराठवाडा शांत करून तुम्ही निर्णय घेतला. सरकारचं काय होईल ते होईल आपण हे काम केलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही बाबासाहेबांचं नाव जोडलं. आज अशी परिस्थिती आहे.
शरद पवार काय म्हणाले…
मुख्यमंत्री जरांगेंना भेटले काय चर्चा केली. काय आश्वासने दिली हे आम्हाला माहीत नाही, असं पवार म्हणाले. तुम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडवायला गेला तुम्ही त्यांना काय सांगितलं माहीत नाही, असं शरद पवार मला म्हणाले. परंतु दोन दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करु अन् या प्रश्नावर मार्ग काढू, असे शरद पवार यांनी सांगितले.
ओबीसीसाठी मी राहुल गांधी यांची भेट घेणार
मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न सोडवावा सुटावा, ओबीसी आणि मराठ्यांचा. तंग झालेलं वातावरण सुटावे, यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला वाटलं की राहुल गांधींना भेटलं पाहिजे. किंवा पंतप्रधानांना भेटलं पाहिजे तर त्यांनाही भेटेल. कारण राज्यातील वातावरण शांत असलं पाहिजे,. गोरगरीबांची घरे पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कुणी उठता कामा नये, असे भुजबळ यांनी म्हटले.