मुंबईच्या पॉवरफुल पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी का झाली?; हे आहेत 5 मोठी कारणं!

सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. (why Mumbai Police commissioner Param Bir Singh transfer?, read five reasons)

मुंबईच्या पॉवरफुल पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी का झाली?; हे आहेत 5 मोठी कारणं!
Param Bir Singh
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 5:47 PM

मुंबई: सचिन वाझे प्रकरणी अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेप्रकरण सरकारसाठी डोकेदुखी ठरलं होतं. त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. एकूण पाच कारणांमुळे सिंग यांची बदली करण्यात आली आहे. काय आहेत ही कारणं त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप… (why Mumbai Police commissioner Param Bir Singh transfer?, read five reasons)

एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता

अँटालिया स्फोटप्रकरणात सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली कार आपणच ठेवल्याची वाझे यांनी कबुली दिल्याचं एनआयएच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक असल्याने पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. एनआयएचे बडे अधिकारीही मुंबईत आले होते. सिंग यांची एनआयएने चौकशी केल्यास ती सरकार आणि पोलीस दलासाठी मोठी नामुष्की ठरली असती. पहिल्यांदाच एखाद्या पोलीस आयुक्तांची चौकशी झाल्यास त्याचा मेसेजही चुकीचा गेला असता. त्यामुळे सिंग यांना पदावरून हटवण्याचा सरकारने निर्णय घेतला असावा, असं सूत्रांनी सांगितलं.

देशमुखांच्या अडचणी वाढल्या असत्या

परमबीर सिंग यांना पदावरून हटवलं नसतं आणि मुंबईचे पोलीस आयुक्तपदी असतानाच परमबीर सिंग यांची चौकशी झाली असती तर ती पोली दलाची आणि गृहखात्याची मोठी नामुष्की ठरली असती. सिंग यांना चौकशीला बोलावण्यात आलं असतं तर नैतिकतेची जबाबदारी म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी लावून धरली असती. त्यामुळे देशमुख यांच्यावर राजीनाम्याची वेळही ओढवली गेली असती. देशमुखांच्या या अडचणी वाढू नयेत म्हणूनच सिंग यांचा बळी दिला असावा, असंही सूत्रांनी सांगितलं.

पवारांचा स्पष्ट सल्ला

वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली होती. वाझे काय लादेन आहे का? असं म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही वाझे यांच्या अटकेनंतर तोंडघशी पडले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ठाकरे सरकारच्या मदतीला धावून आले. पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली आणि कितीही मोठा अधिकारी असला तरी त्यांच्यावर कारवाई करा, असा स्पष्ट सल्ला पवारांनी ठाकरेंना दिला होता. त्यानंतर वेगाने हालचाली घडल्या आणि अखेर मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचंही राजकीय निरीक्षक सांगतात.

राष्ट्रवादीचा दबाव

आधी संजय राठोड प्रकरणामुळे अनिल देशमुख अडचणीत आले होते. हे प्रकरण थांबते न थांबते तोच वाझे प्रकरण उद्भवल्यामुळे देशमुख आणखी अडचणीत आले होते. देशमुखांनी मनसुख हिरेन प्रकरणात वाझे यांचा बचावही केला होता. परंतु वाझेंना अटक केल्यानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशमुख हे गृहखातं सांभाळण्यात अपयशी ठरल्याचं चित्रंही निर्माण झालं होतं. त्यामुळे या प्रकरणात देशमुख यांचा बळी जाऊ नये म्हणून सिंग यांचा बळी देण्यात आल्याचंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सिंग यांना वेळकाढूपणा नडला

अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली कार सापडली. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर वाझे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. विरोधकांनी वाझेंकडून तपास काढून घेण्याची मागणी केली होती. त्याची सिंग यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पोलीसांना जबाब दिला. त्यात वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचीही दखल घेऊन सिंग यांनी वाझेंवर कारवाई केली नाही. उलट वाझेंना कार्यालयात बोलावून त्यांनी त्यांच्याशी तास न् तास बैठक केली होती. वाझेंची बदली करण्यात आल्याच्या दिवशीही सिंग यांनी दोन तास वाझेंसोबत बैठक केली होती. सिंग यांचा हाच वेळकाढूपणा त्यांना नडल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. (why Mumbai Police commissioner Param Bir Singh transfer?, read five reasons)

संबंधित बातम्या:

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; कोण आहेत नगराळे?

केवळ परमबीर सिंगच नव्हे, चार बड्या अधिकाऱ्यांची बदली

(why Mumbai Police commissioner Param Bir Singh transfer?, read five reasons)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.