मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंडे प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धनंजय मुंडेंवर बदनामीचं संकट ओढवलेलं असताना पंकजा मुंडे गप्प असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (why pankaja munde silence on dhananjay munde rape case?)
धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार नितेश राणे यांच्यासह महिला आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची केली आहे. चंद्रकांतदादांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या अर्धा डझन नेत्यांनी मुंडेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार पूनम महाजन यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यातही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मौनाची कारणे
पंकजा यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर मौन बाळगण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. त्यापैकी कौटुंबीक प्रश्न असल्याने जाहीर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याने पंकजा यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. शिवाय ही खासगी बाब आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण हनी ट्रॅपचं असल्यासारखं दिसत आहे, त्यामुळे चित्रं स्पष्ट झाल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल म्हणूनही त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं असावं, असं जाणकार सांगतात.
भाजप नेत्यांनी मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीकडूनही कालपेक्षा आज वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळेही पंकजा मुंडे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असाव्यात असंही सूत्रांनी सांगितलं.
पंकजा मुंडे मुंबईतच
पंकजा मुंडे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्या परळीला गेलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात त्या परळीत होत्या. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आढावा घेतला. त्यानंतर त्या मुंबईत आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (why pankaja munde silence on dhananjay munde rape case?)
कुटुंब आणि कलह
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबात राजकीय महत्वकांक्षेमुळे मोठा कलह निर्माण झाला. त्यातूनच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तर पंकजा या भाजपमध्येच राहिल्या. भाजपची सत्ता आल्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्यावरून पंकजा यांना जेरीस आणलं होतं. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पकंजा यांचा पराभव केला होता. टोकाचा राजकीय विरोध असतानाही धनंजय आणि पंकजा यांच्यातील बहीण-भावाच्या नात्यात वितुष्ट आलेलं नव्हतं. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंकजा यांनी त्यांना फोन करून धीर दिला होता. तर पंकजा या कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने क्वॉरंटाईन झाले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना फोन करून तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. मधल्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या ऊस तोड कामगारांच्या बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. यावेळी दोघे हास्यविनोद रमताना दिसले होते. त्यामुळे आता धनंजय मुंडे अडचणीत आल्याने पंकजा यांनी मौन बाळगल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. (why pankaja munde silence on dhananjay munde rape case?)
Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटीलhttps://t.co/v24xJEMIGb#jayantpatil | #DhananjayMunde | #ncp | @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
…मग पंतप्रधान मोदींना दररोज राजीनामा द्यावा लागेल; संजय राऊतांचा भाजपला टोला
Dhananjay Munde | बलात्काराच्या आरोपांनंतरही धनंजय मुंडेंवरील कारवाई राष्ट्रवादीने का टाळली?
Dhananjay Munde LIVE: रेणू शर्माने मलाही ब्लॅकमेल केलं; मुंडेंच्या मेव्हण्याची पोलिसात तक्रार
(why pankaja munde silence on dhananjay munde rape case?)