विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना दोन भाई गैरहजर; रामदास कदम यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच

आज विधान परिषदेतून सहा सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना निरोप देण्यात आल्यानंतर विधान भवनाच्या पायरीवर फोटो काढण्यात आले. मात्र, फोटो काढताना सहा सदस्यांपैकी दोन सदस्य गैरहजर राहिले.

विधानपरिषदेत सदस्यांची निवृत्ती, फोटो काढताना दोन भाई गैरहजर; रामदास कदम यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच
ramdas kadam
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:38 PM

मुंबई: आज विधान परिषदेतून सहा सदस्य निवृत्त झाले. या सदस्यांना निरोप देण्यात आल्यानंतर विधान भवनाच्या पायरीवर फोटो काढण्यात आले. मात्र, फोटो काढताना सहा सदस्यांपैकी दोन सदस्य गैरहजर राहिले. एक म्हणजे काँग्रेस नेते भाई जगताप आणि दुसरे शिवसेना नेते रामदास कदम. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबरोबर फोटो काढायला नको म्हणून रामदास कदम गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही भाईंनी फोटो काढताना दांडी मारल्याने त्याचीच अधिक चर्चा रंगली होती.

आज विधान परिषदेतून भाई जगताप, रामदास कदम, वरुणकाका जगताप, गिरीष व्यास, गोपीचंद बजोरीया आणि प्रशांत परिचारक हे सहा सदस्य निवृत्त झाले. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांच्या बरोबर विधीमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढला जातो. पण हा फोटो काढते वेळी रामदास कदम आणि भाई जगताप हे अनुपस्थित राहिले. अनिल परब यांच्या बरोबर फोटो काढला जाऊ नये म्हणून रामदास कदम हे अनुपस्थित राहिले अशी चर्चा सुरू आहे. याचवेळी भाई जगताप यांनी अनुपस्थित राहून कोणाबद्दल नाराजी व्यक्त केली असा सवाल केला जात आहे. मात्र, दोन्ही भाई अनुपस्थित राहिल्याने दिवसभर चर्चा सुरू होती.

गेल्याच आठवड्यात हल्लाबोल

दरम्यान, रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन थेट अनिल परब यांच्यावरच हल्लाबोल केला होता. कदम यांनी अनिल परब आणि उदय सामंत यांची निष्ठा काढतानाच परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गद्दार कोण अनिल परब की रामदास कदम हे शिवसैनिकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर परब हे शिवसेनेच्या मुळावर उतरले आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. योगेश कदम आमदार आहेत. त्यांनी उमेदवार पाहिले. पक्षाला कळवलं. आणि पक्षनेत्यांनी मुलाखती घेतल्या. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असं ते म्हणाले होते.

परब यांनी मिटिंग बोलावली या मिटिंगला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि सूर्यकांत दळवी होते. पाच वर्ष या सूर्यकांत दळवींनी संजय कदम यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या मुलाविरोधात काम केलं. त्यानंतर परब यांनी आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते उदय सामंत यांना बोलावून घेतलं. आता सामंत यांच्याकडून निष्ठा शिकावी लागते. त्यांना परब यांनी बोलावलं आणि तिकीट वाटप केलं. राष्ट्रवादीला 9 आणि शिवसेनाला 5 जागा घेतल्या. पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची पाच वर्ष सत्ता असतानाही राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद दिलं. मग परब निष्ठावंत कसे? त्यांनी संपूर्ण पक्ष राष्ट्रवादीला आंदण देण्याचं काम सुरू केलं आहे, असा दावाही त्यांनी केला होता.

रामदासभाई माझे नेते

दरम्यान, अनिल परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर टीका करणं टाळलं होतं. रामदास कदम हे माझे नेते आहेत. मी शिवसैनिक आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काहीच बोलणार नाही, असं परब म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

ठरलं! पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच; तारीखही ठरली

VIDEO: चंद्रकांत पाटील म्हणाले, राष्ट्रपती राजवट स्वीकारून केंद्राकडे कारभार द्या; शरद पवार म्हणतात, त्यांना माझ्या शुभेच्छा

विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.