गणेशोत्सवाबाबत शिवसेना चोरी-छुपे बैठका का घेतेय?, आशिष शेलारांचा सवाल
गणेशोत्सवाबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरी चोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : गेल्या 47 वर्षांपासून असलेली बंदी उठवून दारु परवाने वाटप केले जात आहेत आणि 125 वर्षांहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? याबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्याऐवजी सेना भवनात शिवसेनेकडून चोरी चोरी छुपके छुपके बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. (Why ShivSena holding secret meetings regarding Ganeshotsav? Ashish Shelar’s question)
भाजपा प्रदेश कार्यालयात आज पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, गणेशाच्या मुर्तीच्या उंचीवर निर्बंध घालून कोरोना कसा रोखणार आहात? गर्दीचे अन्य नियम आम्हाला मान्य पण घरातील मुर्तीची उंची सरकार ठरवते आहे. असं का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता, कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड संताप, संभ्रम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत सर्वपक्षीय बैठक घेणे आवश्यक आहे. तसे न करता सेना भवनात बैठका का घेतल्या जात आहेत? कसली लपवाछपवी सुरु आहे? असा सवालही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
गणेशोत्सवाच्या शिवसेना चोरी-चोरी छुपके-छुपके बैठका का घेतेय? | महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव समन्वय समिती, महासंघ यांना विश्वासात न घेता , कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता उत्सवाची नियमावली एकतर्फी जाहीर करण्यात आली आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/01bNy1GGdy
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2021
गणेश मुर्तीकरांनी सरकारने नियमावली जाहीर करण्यापूर्वीच मुर्ती तयार केल्या होत्या. खरंतर ही बाब सरकारने लक्षात घेऊन यापूर्वीच त्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देणे आवश्यक होते, पण तसे घडले नाही. एकतर्फी नियमावली जाहीर करण्यात आली, त्यामुळे मुर्तीकारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने मदत देणे आवश्यक आहे. म्हणून सर्वपक्षीय बैठक घेऊन या सर्व बाबींचा विचार मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे, असेही आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.
४७ वर्षे असलेली बंदी उठवून दारु परवाने वाटप करताय आणि १२५ वर्षाहून जुन्या गणेशोत्सवावर बंदी का घालताय? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/eYvtvWPomZ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2021
इतर बातम्या
इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा एल्गार, राज्यभर 10 दिवस आंदोलनांचा धडाका : नाना पटोले
(Why ShivSena holding secret meetings regarding Ganeshotsav? Ashish Shelar’s question)