अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला… अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला

uddhav thackeray on bjp: नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही.

अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला... अयोध्येतील भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरे यांचा टोला
ram mandir uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 3:25 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराची केलेली प्राणप्रतिष्ठा भाजपला उत्तर प्रदेशात यश मिळवून देऊ शकली नाही. अगदी अयोध्या ज्या मतदार संघात येते त्या फैजाबाद लोकसभा मतदार संघातही भाजपचा पराभव झाला. त्यावरुन शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच घेरले. शनिवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला, असा खोचक टोला लगावला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीने शनिवारी राज्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नाशिकमध्ये २२ जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी मी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपमुक्त राम हवा आहे. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही.

मोदींचे पद कसेबसे वाचले

नरेंद्र मोदी यांना समजायला पाहिजे होते की, संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिले होते. परंतु त्यांना ते समजले नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनतेने धडा दिला. आता कसेबसे त्यांचे पंतप्रधानपद वाचले आहे. आता त्यांचे सरकार किती दिवस राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते खोटे आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. त्यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आमच्यासोबत येणाऱ्यांचे स्वागत

काही लोक आमच्यासोबत होते. त्यांना घेऊन पुढे जाऊ. कुणी जर आमच्यासोबत येत असतील. कोणतीही अट आणि ओढताण न करता येत असतील तर त्यांनी यावे. मी हे सर्वांसंदर्भात बोलत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार… महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...