Mumbai Rains: काही तासांच्या पावसात मुंबईची का होते ‘तुंबई’, ही आहेत कारणे, जपानचे हे तंत्रज्ञान मुंबईची समस्या सोडवणार

26 जुलै 2005 मध्ये मुंबईत 24 तासांत 900 मिलीमीटर पाऊस झाला. एका दिवसांत झालेला हा पाऊस संपूर्ण जुलै महिन्यातील पाऊस होता. या पावसामुळे मुंबई ठप्प झाले होते. या पावसात 1094 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 कोटीचे नुकसान झाले होते. त्यानंतर मुंबईत काहीच बदल झाला नाही. जास्त पाऊस पडला की मुंबई ठप्प होते.

Mumbai Rains: काही तासांच्या पावसात मुंबईची का होते 'तुंबई', ही आहेत कारणे, जपानचे हे तंत्रज्ञान मुंबईची समस्या सोडवणार
मुंबईतील पाऊस
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 12:58 PM

देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबई सोमवारी पुन्हा एकदा जलमय झाली. सहा तासांमध्ये 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईची ‘तुंबई’ बनली. मुंबईत पडणाऱ्या वर्षभरातील पावसापैकी 10 टक्के पाऊस रविवारी रात्री ते सोमावारी सकाळी सात वाजेपर्यंत झाला. कारण भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे त्याला इतरही कारणे आहेत.

26 जुलै 2005 मध्ये मुंबईत 24 तासांत 900 मिलीमीटर पाऊस झाला. एका दिवसांत झालेला हा पाऊस संपूर्ण जुलै महिन्यातील पाऊस होता. या पावसामुळे मुंबई ठप्प झाले होते. या पावसात 1094 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 कोटीचे नुकसान झाले होते. त्यानंतर मुंबईत काहीच बदल झाला नाही. जास्त पाऊस पडला की मुंबई ठप्प होते.

हे सुद्धा वाचा

मुंबई तुंबण्याची ही आहेत कारणे

  • मुंबई शहर अरबी समुद्राला लागून आहे. शहरात मिठी, दहिसर, ओशिवारा आणि पोयसर या चार नद्या आहेत. मिठी नदी संपूर्ण मुंबई शहराला वळसा घालते. अनेक ठिकाणी नदीची रुंदी केवळ दहा मीटर आहे. त्यामुळे जास्त पाऊस झाली की नदी ओव्हरफ्लो होते.
  • मुंबईचे आकार देशातील इतर शहरांपेक्षा वेगळे आहे. समुद्राच्या किनारी सात द्विप असलेले हे शहर अनेक ठिकाणी खूप खाली आहे. तसेच काही ठिकाणी उंचावर आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरु होताच पाणी सुरु होताच ते खालच्या भागाकडे जाऊ लागते. यामुळे खालचा भाग असलेला सायन, अंधेरी सबवे, मिलान सबवे आणि खार हा भाग पाण्यात जातो.
  • शहराची ड्रेनेज व्यवस्था अशी आहे की पाणी समुद्रात जाते. परंतु मुसळधार पावसात समुद्राची पातळी वाढल्यामुळे ड्रेन्सज सिस्टीमचे गेट बंद केले जातात. समुद्राचे पाणी शहरात परत येऊ नये म्हणून ही दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास जागाच नसते. पाणी ओसरल्यानंतर ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी 6 तास लागतात.
  • देशातील बहुतांश शहरांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरते. परंतु मुंबईत परिस्थिती वेगळी आहे. मुंबईतील ९० टक्के पाणी वाहून जाते. यामुळे ड्रेनेजवरही मोठा भार पडतो.
  • मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. इतक्या लोकांना सामावून घेण्याचे नियोजन नाही. अनेक लोक सखल भागात राहतात. त्यासाठी अतिक्रमण केले जाते. यामुळे कमी पावसातही अनेक सखल भागात पाणी साचते.

यावर प्रकल्पावर केवळ चर्चा

गेल्या काही काळापासून जपानच्या मदतीने मुंबईत भूमिगत पाईपलाईन (अंडरग्राउंड डिस्चार्ज चॅनल ) करण्यावर चर्चा सुरु आहे. जपाननेही टोकियो शहरात हा प्रकल्प तयार केला. कारण टोकियोमधील 3.5 कोटींहून अधिक लोकसंख्या नेहमीच पुराच्या धोक्यात राहते. यामुळे जपानने भूमिगत वाहिनी बनवली आहे. यामुळे पुराचे पाणी किंवा जास्तीचे पाणी या जलवाहिनीतून जाते आणि ते पंपाद्वारे इडो नदीत सोडले जाते.

मुंबईचा स्पंज सिटीप्रमाणे विकास करण्याचीही चर्चा आहे. स्पंज सिटी ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये हे शहर स्पंजसारखे काम करते म्हणजेच आत पाणी टाकताच ते सुकते. याअंतर्गत शहराची रचना अशा पद्धतीने करण्यात येणार आहे की, पाणी लगेच जमिनीत जाईल आणि नाल्यांवर कोणताही भार पडणार नाही. यामध्ये ग्रीन स्पेस वाढविण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.