मोठी घडामोड ! शिवसेना फुटीनंतर ठाकरे, शिंदे, फडणवीस पहिल्यांदाच एकाच मंचावर?; 23 जानेवारीचा दिवस महत्त्वाचा ठरणार?

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे.

मोठी घडामोड ! शिवसेना फुटीनंतर ठाकरे, शिंदे, फडणवीस पहिल्यांदाच एकाच मंचावर?; 23 जानेवारीचा दिवस महत्त्वाचा ठरणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 9:19 AM

मुंबई: शिवसेना फुटल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमनासामना होईल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील चर्चेत भाग घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित नव्हते. त्यामुळे तिघेही नेते समोरासमोर आले नाहीत. आता मात्र, हे तिन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. निमित्त आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं. त्यामुळे हे तिन्ही नेते एकत्र येणार का? आणि आले तर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात बसविण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण समारंभास प्रख्यात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे. येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हा तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.

हे सुद्धा वाचा

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच मंचावर येतील.

त्यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? ते एकमेकांशी संवाद साधतील का? एकमेकांशी हस्तांदोलन करतील का? त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्याशिवाय या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून शिंदेसोबत आलेला दुरावा दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे टाकणार का? याचंही उत्तर मिळणार आहे.

तसेच निमंत्रण नाही स्वीकारलं तर शिंदेंसोबतची उद्धव ठाकरे यांची कटुता दूर झाली नसल्याचंही अधोरेखित होणार आहे, असं सांगितलं जातं. त्यामुळेच 23 जानेवारी हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. प्रत्येक कार्यक्रमातून दोन्ही गटाकडून रोज एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी अधिकच दूर गेलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे-शिंदे यांच्या एकाच कार्यक्रमातील भेटीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.