अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांच्या इशाऱ्याने खळबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता नवा इशारा दिला आहे. (Will expose another person who related with ajit pawar with evidence, says kirit somaiya)

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार; किरीट सोमय्यांच्या इशाऱ्याने खळबळ
Kirit Somaiya
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 6:50 PM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता नवा इशारा दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. अजित पवारंना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. आशा करतो की त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असावी, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.

लूट माजवली

बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदींनी करून दाखवलं

पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून रेड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावच लागेल. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावंच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असं मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करून दाखवलं, असंही ते म्हणाले.

घोटाळा केलाय तर हिशोब द्यावाच लागेल

अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही, असं सांगतानाच आता घोटाळा केलाय तर हिशोब द्यावाच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

काय आहे प्रकरण?

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या:

‘मराठी माणूस नॉट अलाऊड’ म्हणणाऱ्यांवर मीरा रोडमध्ये अखेर गुन्हे दाखल, मराठी एकीकरण समितीच्या संघर्षाला यश

आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर

दुकाने सुरुच ठेवणार, काळ्या फिती बांधून लखीमपूर खेरी घटनेचा निषेध, पुण्यात व्यापाऱ्यांचा पवित्रा, बंद यशस्वी होणार ?

(Will expose another person who related with ajit pawar with evidence, says kirit somaiya)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.