Maratha Reservation | मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी फेटाळली

Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांची कुठली मोठी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावली. जयंत पाटील यांनी बैठकीत काय घडलं? त्याची माहिती दिली.

Maratha Reservation | मोठी बातमी, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी फेटाळली
manoj jarange patil-eknath shinde
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 1:58 PM

मुंबई :  मराठा आरक्षणासंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावली आहे. ‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बैठक संपल्यानंतर जयंत पाटील बाहेर आले. त्यावेळी त्यांना बैठकीत काय चर्चा झाली? काय ठरलं? असं विचारण्यात आलं. “काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे. फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला” असं जयंत पाटील म्हणाले. कुणबीमधून मराठा समाजाला ससकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याच जयंत पाटील म्हणाले. आरक्षणासाठी आयोग काम करतोय, असं जयंत पाटील म्हणाले.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्या” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सहकार्य कराव” असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलय. “आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नय़े. सकल मराठा समाजाने सहकार्य करावं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.